ETV Bharat / city

Covid Vaccination : मुंबईत ९४ हजार कोविड योद्ध्यांचे दोन डोस झाले नाही, नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र - कोरोना योद्ध्यांना लसीकरणासाठी नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

भाजप आमदार नितेश राणे(Nitesh Rane) यांनी फ्रंटलाईन वर्कर्सच्या कोरोना लसीकरणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना(Uddhav Thackeray) पत्र लिहिले आहे. ९४ हजार फ्रंटलाइन वर्कर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांचे अजून दोन्ही डोस झाले नसल्याचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Nitesh Rane
Nitesh Rane
author img

By

Published : Nov 30, 2021, 11:15 AM IST

मुंबई : भाजप आमदार नितेश राणे(Nitesh Rane) यांनी फ्रंटलाईन वर्कर्सच्या कोरोना लसीकरणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना(Uddhav Thackeray) पत्र लिहिले आहे. कोरोना काळात अनेकांनी आपले प्रियजन गमावले. या कठीण काळात महाविकास आघाडी सरकारने व मुंबई महानगर पालिकेत असलेल्या सत्ताधारी सेनेने आपल्या नियोजनाचा अभाव आणि अनाठायी निर्बंधांतून सामान्य जनतेला मेटाकुटीला आणलं. परंतु अशाही परिस्थितीत फ्रंटलाईन वर्कर, कोविड वॉरिअर्सनी आपल्या कुटुंबाचा विचार न करता सामान्य नागरिकांची अहोरात्र सेवा केली. त्यांच्या नशिबी मात्र आघाडी सरकारने फक्त फरफट आणून ठेवली आहे.९४ हजार फ्रंटलाइन वर्कर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांचे अजून दोन्ही डोस झाले नसल्याचे पत्र भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.

Nitesh Rane Letter
Nitesh Rane Letter
मदतीच्या फक्त घोषणाचदवाखान्यात लागणाऱ्या आगी, ऑक्सिजनअभावी तडफडून मेलेली जनता, ऑक्सिजन गळती यामुळे आरोग्य सेवेचे पुरते धिंडवडे निघाले. आरोग्य कर्मचाऱ्यांचे पगार वेळवर नाही म्हणून त्यांना आंदोलने करावी लागली. सरकार साधं विम्याचं कवचही कर्मचाऱ्यांना व फ्रंटलाइन वर्कर्सना देऊ शकले नाही. जे कर्मचारी कर्तव्यावर असताना मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीच्या फक्त घोषणाच झाल्या, असा आरोप या पत्रात करण्यात आला आहे. तसेच ज्या फ्रंटलाइन वर्कर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाचं भांडवलं करत राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला. त्याच फ्रंटलाईन वर्कर्सच्या दुसऱ्या लसीकरणाचा टप्पा सताधारी सेनेला पूर्ण करता आलेला नाही. २६ जानेवारीपासून मुंबईत पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील कर्मचारी आणि दुसऱ्या टप्प्यात फ्रंट लाईन वर्कर यांच्या लसीकरणाची मोहिम राबवण्यात आली होती. परंतु या कर्मचाऱ्यांचे अद्यापही लसीकरण झालेले नाही असे या पात्रात म्हटले आहे.
Nitesh Rane Letter
Nitesh Rane Letter
कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या डोस विषयी पालिका उदासीनकोरोनाशी दोन हात करणाऱ्या सुमारे ९४ हजार आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर यांचे दोन डोस झालेले नाही. ही अत्यंत खेदजनक व लाजिरवाणी बाब आहे. आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्करच्या लसीकरणाची मोहिम महापालिकेने हाती घेतल्यानंतर ७ लाख ५६ हजार ५३९ जणांचे लसीकरण झाले. यातील फक्त ४ लाख २५ हजार ४६४ जनांचा केवळ पहिलाच डोस झाला आहे. तर त्यातील केवळ ३ लाख ३१ हजार ७५ जणांचेच दोन डोस पूर्ण झाले आहेत. म्हणजे ९४ हजार ३८९ आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्सचा फक्त एकच डोस झाला आहे. मुंबई महानगर पालिका आपल्याचं कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या डोसविषयी हलगर्जी व उदासीन आहे. हा विरोधाभास पालिका प्रशासनातील गोंधळच दर्शवतो असेही राणे म्हणाले आहेत.वस्तुस्थिती आपल्यापासून लपवली गेली असेलकालच आपण महाविकास आघाडी सरकारची धुरा आपल्या खांद्यावर सांभाळात करोनाच्या नवीन व्हेरीअंट बाबत मुंबई महापालिकेत आढावा बैठक घेतली. पण मला खात्री आहे की ही वस्तुस्थिती आपणापासून लपवली गेली असेल म्हणूनच मी हे वास्तव आपल्या निर्दशनास आणून देऊ इच्छीतो. जेणेकरून महानगर पालिकेचे फ्रंटलाईन वर्कर तथापी आरोग्य कर्मचारी यांना संशय निर्माण ना होवो की ठाकरे सरकार हे त्यांच्या सोबत संधीसाधूपणाच राजकारण तर करत नाही ना? असा सवालही नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.