ETV Bharat / city

Nitesh Rane Tweet : BMC चा भ्रष्टाचार सांगणारे भोंगे मुंबईत चालू केले तर चालतील का? नितेश राणे यांचं ट्विट

मुंबईत भोंग्यावरून सुरु असलेल्या राजकारणात ( Loudspeaker Politics In Mumbai ) भाजप आमदार नितेश राणे ( Nitesh Rane On Loudspeaker Issue ) यांनी उडी घेतली आहे. मुंबई महापालिकेचा भ्रष्टाचार ( Corruption In BMC ) सांगणारे भोंगे मुंबईत चालू केले तर चालतील का? असं ट्विट करून नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला ( Loudspeakers Of BMC Corruption ) आहे.

नितेश राणे
नितेश राणे
author img

By

Published : Apr 15, 2022, 7:56 PM IST

मुंबई - सध्या मुंबईत भोंग्यावरून राजकारण ( Loudspeaker Politics In Mumbai ) तापलेलं असताना भाजप नेते नितेश राणे यांनी वादग्रस्त ट्विट करून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. बीएमसीचा भ्रष्टाचार सांगणारे भोंगे मुंबईत लावले तर चालतील ( Loudspeakers Of BMC Corruption ) का? असा प्रश्न त्यांनी ट्विटद्वारे उपस्थित केला ( Nitesh Rane On Loudspeaker Issue ) आहे.

भोंग्यावरून वरून बीएमसी ची पोलखोल : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी ३ मेपर्यंत अल्टीमेटम राज्य सरकारला दिला आहे. यावरून सध्या राज्यात राजकारण मोठ्या प्रमाणामध्ये तापलेलं आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर वेळोवेळी राजकीय पक्षांनी आपल्या भूमिका बदलल्या असा आरोप दोन्ही बाजूंनी होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सोयीचे राजकारण करत आहेत असा आरोपही सत्ताधाऱ्यांनी राज ठाकरे यांच्यावर केला आहे. आता यात भाजप नेते, आमदार नितेश राणे यांनी भोंग्यावरून बीएमसीमधील भ्रष्टाचार सांगायला सुरुवात केली तर चालेल का? असा ट्विटद्वारे प्रश्न उपस्थित करून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

नितेश राणे यांचं ट्विट
नितेश राणे यांचं ट्विट

काय आहे ट्विट मध्ये? : नितेश राणे म्हणतात की, महागाईवर भोंगे लावण्या अगोदर, बीएमसीमधील भ्रष्टाचार ( Corruption In BMC ) सांगणारे भोंगे मुंबईत लावले तर चालतील का? पेंग्विन पासुन सुरुवात करु...

यशवंत जाधव वरील कारवाई भाजपच्या पथ्यावर : मागील ३० वर्षे मुंबई महानगर पालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. या दरम्यान भ्रष्टाचाराचे अनेक आरोप सातत्याने त्यांच्यावर होत होते. विशेषकरून आता भाजप व शिवसेना यांची मुंबई महानगर पालिकेतील युती तुटल्यानंतर भाजपने शिवसेनेला भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर धारेवर धरण्याचे ठरवलं आहे. महानगरपालिकेतील स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्याकडे ईडीच्या कारवाईत मोठ्या प्रमाणामध्ये संपत्ती सापडल्याने एकीकडे शिवसेनेची डोकेदुखी वाढलेली आहे. त्यात आता भाजप भ्रष्टाचाराच्या प्रत्येक मुद्द्यावर शिवसेनेला धारेवर धरण्याचा प्रयत्न करत आहे. महानगरपालिकेतील टेंडर घोटाला असेल, नालेसफाईमधील भ्रष्टाचार असेल, पेंग्विनमधील भ्रष्टाचार असेल या सर्व मुद्द्यांची पोल-खोल भोंग्यावरून केली तर चालेल का? असं सांगत नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

महापालिकेवर सत्ता काबीज करण्यासाठी तयारी : एकीकडे येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका बघता आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झालेला आहे. महाविकास आघाडी सरकार विरोधात लढण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, कुठल्याही परिस्थितीत यंदा महापालिकेवर सत्ता काबीज करण्यासाठी भाजप पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरलेला आहे. अशात भोंग्यावरून शिवसेनेचे महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराचे वाभाडे काढण्यासाठी आता भाजप सज्ज झाल्याचा इशारा नितेश राणे यांनी ट्विट द्वारे दिला आहे.

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांवर आरोप होताच बाळासाहेबांनी राजीनामा घेतला होता - नितेश राणे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.