ETV Bharat / city

नव्वदी पार दोघांची कोरोनावर मात, रुग्णालयातून ठणठणीत बरे होऊन परतले घरी - नव्वदी पार रुग्ण कोरोनामुक्त

कोरोना संसर्गाचा धोका ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. मात्र, नव्वदी पार केलेल्या दोन रुग्णांनी कोरोनावर मात करत खडतर परिस्थितीत सकारात्मक राहत कोरोनावर यश मिळवता येत असल्याचे दाखवून दिले आहे.

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Sep 15, 2020, 12:53 AM IST

मुंबई - कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिकांना असून रुग्णांमध्ये आणि मृतांमध्येही ज्येष्ठ नागरिकांचाच मोठ्या संख्येने समावेश आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिकांना विशेष काळजी घेण्याची गरज आहे, पण घाबरून जाण्याची आवश्यकत मात्र मुळीच नाही. कारण 60 ते 100 वर्षापर्यंतचे रुग्णही मोठ्या संख्येने बरे होत असल्याचे आशादायी चित्र आहे. प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर ज्येष्ठ नागरिकही कोरोनाला हरवत असून मुंबईत नुकतीच अशी दोन उदाहरणे समोर आली आहेत. मध्य मुंबईच्या वोक्खार्ट येथील रुग्णालयात नव्वदी पार केलेल्या दोन जणांनी नुकतीच कोरोनावर मात केली. दोन्ही रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत.

घनश्यामदास चंचलानी (वय 92) हे पनवेलमध्ये राहतात. त्यांना ताप येत होता. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार सुरू केले. पण तरीही तब्येतीत सुधारत नसल्याने त्यांची कोरोना टेस्ट केली. ती पॉझिटिव्ह आली. त्यांच्या कुटुंबाने तत्काळ त्यांना वोकहार्ट रुग्णालयामध्ये दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू झाले. त्यांनी न घाबरता उपचारांना प्रतिसाद दिला. त्यांची ऑक्सिजनची पातळी वाढत गेली. पुढे संसर्ग कमी झाला आणि आजोबा ठणठणीत बरे झाले. त्यांना घरी सोडण्यात आले. तर घरी त्यांना 14 दिवस क्वारंटाइन केले होते. आता त्यांची तब्येत ठीक असल्याने डॉक्टरांनी ते कोरोनातून बरे झाल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा - सरकार स्वतःची जबाबदारी विसरणार हे कसं चालेल? राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

चंचलानी आजोबांसह माधुरी संपत या 91 वर्षीय आजीबाईंनीही कोरोनावर मात केली आहे. मागील 6 महिन्यांपासून अंथरुणात असलेल्या आजींना कोरोनाची लागण झाली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनीही आजोबांप्रमाणे इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनाला हरवले. या दोघांवर उपचार करणारे येथील वरिष्ठ डॉक्टर बेहराम पारडीवाला यांनी हे दोन्ही रुग्ण ठणठणीत बरे झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. कुठल्याही वयात कोरोना बरा होतो. फक्त रुग्णांनी वेळेत डॉक्टरांकडे येणे गरजेचे आहे. ताप, सर्दी, थकवा असे आजार अंगावर काढू नयेत. महत्त्वाचे म्हणजे घाबरून न जाता इच्छाशक्ती दाखवावी. ज्यामुळे कोरोनासारख्या आजाराला सहज हरवता येते. हेच या दोन नव्वदी पार केलेल्या आजी-आजोबांनी दाखवून दिल्याचे डॉ. पारडीवाला सांगतात. या दोन्ही रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टर आणि रुग्णालयाचे आभार मानले आहेत.

हेही वाचा - 'माझे कुटूंब, माझी जबाबदारी' मोहीम परिणामकारकपणे राबवा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.