मुंबई अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने मुंबईत मोठी कारवाई केली आहे. छापा टाकून 91 किलो 500 ग्रॅम सोने आणि 340 किलो चांदी जप्त केली आहे. मेसर्स रक्षा बुलियन आणि मेसर्स क्लासिक मार्बल्सच्या संबंधित 4 ठिकानांवर ईडीने छापा टाकला. मेसर्स पारेख अल्युमिनेक्स लि.च्या प्रकरणातील मनी लाँड्रिंग चौकशीच्या संदर्भात ही छापेमारी करण्यात आली. 47.76 कोटी किंमतीचे 91.5 किलो सोने आणि 340 किलो चांदी जप्त करण्यात आली आहे.
ॲल्युमिनियम फॉइल कंटेनर आणि स्टोरेज ॲल्युमिनियम कंटेनर्सच्या निर्मितीमध्ये गुंतलेली मुंबई स्थित कंपनी मेसर्स पारेख अल्युमिनेक्स लिमिटेडशी संबंधित मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशी संदर्भात ईडीने छापे टाकले. ED ने 8 मार्च 2018 रोजी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA), 2002 च्या तरतुदींनुसार मेसर्स पारेख अल्युमिनेक्स लिमिटेड विरुद्ध मनी लाँडरिंगचा गुन्हा नोंदवला.
व्यवहारांसाठी कोणतेही करार नाही कंपनीने बँकांची फसवणूक केली आणि 2296.58 कोटी रुपयांचे कर्ज घेतले, जे नंतर विविध कंपन्यांच्या माध्यमातून पैसे काढून घेण्यात आले. असुरक्षित कर्ज आणि गुंतवणुकीच्या संदर्भात पैसे विविध खात्यांमध्ये पाठवले गेले आहे. कर्ज घेण्याचा हाच उद्देश नव्हता आणि अशा व्यवहारांसाठी कोणतेही करार नाहीत, असे ईडीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
ईडीने निवेदनात म्हटले झडतीदरम्यान, मेसर्स रक्षा बुलियनच्या आवारात खाजगी लॉकरच्या चाव्या सापडल्या. खासगी लॉकर्सची झडती घेतली असता, योग्य नियमांचे पालन न करता लॉकर ऑपरेशन केले जात असल्याचे आढळून आले. कोणतेही केवायसी ( नो युवर कस्टमर ) फॉलो केले गेले नाही, आणि आवारात सीसीटीव्ही कॅमेरा बसवला गेला नाही, असे ईडीने निवेदनात म्हटले आहे.
वस्तूंची एकूण किंमत 47.76 कोटी इन आणि आउट रजिस्टर नव्हते. लॉकर परिसराची झडती घेतली असता, असे आढळून आले की, तेथे 761 लॉकर्स होते. ज्यापैकी 3 मेसर्स रक्षा बुलियनचे होते. लॉकर्स उघडल्यावर 2 लॉकरमध्ये 91.5 किलो सोने आणि 152 किलो चांदी आढळून आली आणि ती जप्त करण्यात आली. मेसर्स रक्षा बुलियनच्या आवारातून अतिरिक्त 188 किलो चांदीही जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या वस्तूंची एकूण किंमत 47.76 कोटी आहे, असे ईडीने म्हटले आहे.