ETV Bharat / city

पॉर्नचे आंतरराज्यीय रॅकेट : सुरतमधील एकासह 9 जणांना अटक, बडे मासे लागणार गळाला?

मॉडेल गहना वशिष्ठला मुंबई क्राइम ब्रँचने शनिवार रात्री अटक केली होती. टीव्ही, चित्रपट या क्षेत्रामध्ये पदार्पण करू इच्छिणाऱ्या आणि यामध्ये करीअर करण्यासाठी धडपड करणाऱ्यांना काम देण्याचे आमिष दाखवून त्यांना अश्लील व्हिडिओ निर्मितीसाठी काम करण्यास ती भाग पाडत होती.

mumbai
अटक केलेले आरोपी
author img

By

Published : Feb 10, 2021, 5:29 PM IST

Updated : Feb 10, 2021, 6:00 PM IST

मुंबई - टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल गहना वशिष्ठला मुंबई क्राइम ब्रँचने शनिवार रात्री अटक केली होती. टीव्ही, चित्रपट या क्षेत्रामध्ये पदार्पण करू इच्छिणाऱ्या आणि यामध्ये करीअर करण्यासाठी धडपड करणाऱ्यांना काम देण्याचे आमिष दाखवून त्यांना अश्लील व्हिडिओ निर्मितीसाठी काम करण्यास ती भाग पाडत होती. त्यानंतर ते व्हिडिओ विविध वेबसाईटवर प्रदर्शित करत लाखो रुपये कमवत असल्याचा तिच्यावर आरोप आहे. मुंबई पोलिसांच्या प्रोपर्टी सेलकडून मढ येथे करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान पॉर्न फिल्म चित्रीकरण करणार्‍या 9 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. या नऊ आरोपींना आज (10 फेब्रुवारी) मुंबईतील न्यायालयामध्ये हजर केले असता यातील 5 जणांना न्यायालयीन कोठडी मिळाली असून, 4 आरोपींना पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. तसेच याप्रकरणी अनेक फिल्म क्षेत्रातील मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पॉर्न फिल्म प्रकरणी एकूण 9 जणांना अटक
  • 5 जणांना न्यायालयीन, तर 4 जणांना पोलीस कोठडी

या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या वंदना तिवारी उर्फ गहना वशिष्ठ, उमेश कामत, दिपांकर खासनवीस उर्फ शान बॅनर्जी व तनवीर हाश्मी या आरोपींना 15 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर यास्मिन रसूल बेग खान ऊर्फ रुवा, प्रतिभा विक्रम नलावडे, मोनू गोपालदास जोशी, भानू ठाकूर, मोहंमद आतिफ नसिर अहमद या आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

  • शान बॅनर्जी आहे कंपनीचा संचालक

दिपांकर खासनवीस उर्फ शान बॅनर्जी हा या प्रकरणांमध्ये अटक करण्यात आलेल्या एका महिलेचा पती असून, पेशाने तो फोटोग्राफर आहे. याबरोबरच ज्या कंपनीच्या माध्यमातून पॉर्न फिल्म शूट केली जात होती त्या कंपनीचा तो संचालकसुद्धा असल्याचं समोर आले आहे. या अगोदर अटक करण्यात आलेल्या अभिनेत्री गहना वशिष्ठ व उमेश कामत या दोघांच्या दरम्यान बँकेच्या माध्यमातून काही आर्थिक व्यवहार झाले असून, उमेश कामत याच्या एका बँक खात्यात व गहना वशिष्ठ हिच्या दोन बँक खात्यामध्ये परदेशातून हजारो डॉलर आले असल्याचा पोलिसांचा दावा आहे. हे पैसे आल्यानंतर त्याचे वाटप केले जात असल्याचेही समोर आले आहे.

  • गहनाचा स्वत:चा स्टुडिओ-

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गहना वशिष्ठ हिचे एक जीवी स्टुडिओ नावाने प्रोडक्शन हाऊस आहे. ज्या माध्यमातून ती हे व्हिडिओ चित्रित करत होती. पोलिसांना आतापर्यंत जवळपास 90 अश्लील व्हिडिओ मिळाले आहेत. हे सर्व व्हिडिओ गहना वशिष्ठच्या स्टुडिओमध्ये चित्रित झाले आहेत.

क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, 3 फेब्रुवारीला गहना वशिष्ठच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. त्यावेळी तिच्या घरातून तीन मोबाईल फोन, एक लॅपटॉप आणि काही बँकांची कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी रात्री तिला अटक करण्यात आली होती.

  • पॉर्नचे सुरत कनेक्शन

या प्रकरणामध्ये नववा आरोपी तनवीर हाश्मी याला गुजरातमधील सुरत येथून अटक करण्यात आली आहे. पॉर्न फिल्म चित्रीकरण संदर्भात एका पीडित महिलेने मालवणी पोलीस ठाण्यांमध्ये आणखीन एक गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी या संदर्भात तनवीर हाश्मी याला सुरत येथून अटक केली आहे.

  • काय आहे प्रकरण?

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, मड आयलँड परिसरातील काही बंगल्यांमध्ये फिल्म शूटिंगच्या नावावर वेश्या व्यवसाय चालतो आणि शॉर्ट पॉर्न व्हिडिओ तयार करण्यात येतात. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापेमारी केली. त्यावेळी पोलिसांच्या असे लक्षात आले की या क्षेत्रात प्रवेश करायची इच्छा असलेल्या स्ट्रगलर मॉडेल्सना चित्रपटात ब्रेक देण्याच्या नावाखाली पॉर्न व्हिडिओत काम करायला सांगितले जायचे. या प्रकरणी पोलिसांनी दोन मुलींची सुटका केली आहे.

  • कोण आहे गहना वशिष्ठ?

गहना वशिष्ठ ही बालाजी प्रोडक्शनची अॅडल्ट सीरिज 'गंदी बात' ची अभिनेत्री आहे. तीने या पूर्वी मिस एशिया बिकिनीचा पुरस्कारही जिंकला आहे. गहना वशिष्ठने आतापर्यंत अनेक हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटात काम केले असून, अनेक जाहिरातीतही ती झळकली आहे.

यासंदर्भातल्या सर्व बातम्या वाचा एका क्लिकवर -

Last Updated : Feb 10, 2021, 6:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.