मुंबई- भाजप नेते निलेश राणे आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यातील वाद मिटण्याची चिन्हे ( Nilesh Rane Vs Dipak Kesarkar ) दिसत नाहीत. दिपक केसरकर यांनी शिवसेना नेता नाराय राणे यांनी टीका केल्यानंतर राणे पुत्रांकडून केसरकर यांचा समाचार घेण्याचे अजूनही थांबलेले नाही.
उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या नेत्यांची वारंवार ट्विटरवरून किंवा जाहीर प्रतिक्रियांमधून खिल्ली उडवणाऱ्या राणे सुपुत्रांमुळे भाजप आणि शिंदे गटात खडाजंगी होत आहे. दीपक केसरकर यांच्या वक्तव्यावरून माजी खासदार निलेश राणे भडकले आहेत. त्यांनी थेट केसरकर यांची लायकी काढली आहे.
भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करत म्हटले, की ( Nilesh Rane slammed Dipak Kesarkar ) दीपक केसरकर म्हणतो मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे. नोकरी मागायची आहे तर नीट मागा, १ तारखेपासून आमच्याकडे ड्रायव्हर ची जागा रिकामी आहे.
-
दिपक केसरकर म्हणतो मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे, नोकरी मागायची आहे तर नीट मागा, १ तारखे पासून आमच्याकडे ड्रायव्हर ची जागा रिकामी आहे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">दिपक केसरकर म्हणतो मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे, नोकरी मागायची आहे तर नीट मागा, १ तारखे पासून आमच्याकडे ड्रायव्हर ची जागा रिकामी आहे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 7, 2022दिपक केसरकर म्हणतो मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे, नोकरी मागायची आहे तर नीट मागा, १ तारखे पासून आमच्याकडे ड्रायव्हर ची जागा रिकामी आहे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 7, 2022
शनिवारी काय म्हणाले होते दीपक केसरकर- नारायण राणे यांचा आणि माझा वाद संपला आहे. जेव्हा मी त्यांना भेटतो, तेव्हा आदरपूर्वक बोलतो. यापुढे नारायण राणे यांच्यावर भाष्य करणार नसल्याचे ते म्हणाले. तसेच संवेदनशील मतदार संघ म्हणून ओळख होती. त्यामध्ये कार्यकर्त्यांचे अंतर्गत वाद कारणीभूत होते. राजकीय नेते कधी वाद करत नाहीत, असेही केसरकर यांनी सांगितले.
दीपक केसरकरांन यापूर्वीही निलेश राणे यांनी सुनावले - एकनाथ शिंदे यांचा गट शिवसेनेतून बाहेर पडला तरीही शिवसेना आणि उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंप्रति आमची निष्ठा असल्याचे शिंदे गटाकडून वारंवार सांगण्यात आले आहे. ( Nilesh Rane ) शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांनीही नुकतीच यावर प्रतिक्रिया दिली. तसेच, भाजप नेते नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे, नितेश राणे यांनी ठाकरे घराण्यावर सुरु असलेली टीका आता बंद करावी. देवेंद्र फडणवीसांना सांगून आम्ही ही टीका बंद करू असे वक्तव्य केसरकरांनी केले होते. मात्र, दीपक केसरकरांनाच निलेश राणे यांनी पुन्हा एकदा सुनावले आहे. दरम्यान, दीपक केसरकर 25 दिवसांपूर्वी तुम्ही किती लहान होतात हे विसरू नका. दीपक केसरकर इज्जत मिळते तर ती घ्यायला शिका, लायकी पेक्षा जास्त बोलू नका, अस निलेश राणे म्हणाले आहेत.
दीपक केसरकर काय म्हणाले होते ? - शिंदे गटाची शिवसेना आणि भाजप यांच्या युतीतून महाराष्ट्रात सरकार बनले आहे. त्यामुळे आता भाजप नेते विशेषतः राणे पुत्र आणि किरीट सोमय्या यांच्याकडून शिवसेना नेते आणि ठाकरे घराण्यावरची टीका थांबेल का, असा प्रश्न विचारला असता त्यावर केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलेलो नाहीत, शिवसेना वाचवत आहोत. त्यामुळे उद्धव ठाकरेंबद्दल आमच्या मित्रपक्षांनी चुकीच्या पद्धतीने टीका टाळावी, अशी विनंती आम्ही केली आहे. किरीट सोमय्या यांनी आता अशी टीका करणार नसल्याचा शब्द दिला आहे. तसेच, नारायण राणे यांची मुलं लहान आहेत. देवेंद्र फडणवीस यांना सांगून आम्ही त्यांनाही समजावून सांगू.. असे वक्तव्य केसरकर यांनी केले होते.