ETV Bharat / city

नायजेरियन युवकाला कुठलाही गुन्हा नसताना दीड वर्ष तुरुंगवास, नुकसान भरपाई देण्याचे न्यायालयाचे निर्देश - ATS information about NigeriNigerian arrested with Pills and drugs powderan

एटीएसच्या माहितीवरून ( ATS information about Nigerian ) एका नायजेरियन तरुणाला 2020 मध्ये संशयास्पद गोळ्या आणि काही ड्रग्स सुदृश्य पावडरसह ( Nigerian arrested with Pills and drugs powder ) पकडण्यात आले होते. या आरोपी विरोधात मुंबई सत्र न्यायालयात खटला देखील सुरू होता; मात्र मिळालेल्या ड्रग्सचे सॅम्पल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविल्यानंतर नायजेरियन युवकाकडे सापडलेल्या गोळ्या आणि ड्रग्ससुदृश्य पावडर ही ड्रग्स नसल्याचे निष्पन्न झाले. यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने संशयित आरोपीला सोडण्याचे निर्देश देत दीड वर्ष कुठलाही गुन्हा नसताना आत असल्याने आरोपीला नुकसान भरपाई ( Release innocent Nigerian youth from prison and pay compensation ) देण्याचे निर्देश राज्य सरकारला ( Mumbai High Court direction to pay damage to Nigerian youth ) दिले आहे.

Bombay High Court Directive
मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
author img

By

Published : Aug 11, 2022, 3:28 PM IST

मुंबई : एटीएसच्या माहितीवरून ( ATS information about Nigerian ) एका नायजेरियन तरुणाला 2020 मध्ये संशयास्पद गोळ्या आणि काही ड्रग्स सुदृश्य पावडरसह ( Nigerian arrested with Pills and drugs powder ) पकडण्यात आले होते. या आरोपी विरोधात मुंबई सत्र न्यायालयात खटला देखील सुरू होता; मात्र मिळालेल्या ड्रग्सचे सॅम्पल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविल्यानंतर नायजेरियन युवकाकडे सापडलेल्या गोळ्या आणि ड्रग्ससुदृश्य पावडर ही ड्रग्स नसल्याचे निष्पन्न झाले. यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने संशयित आरोपीला सोडण्याचे निर्देश देत दीड वर्ष कुठलाही गुन्हा नसताना आत असल्याने आरोपीला नुकसान भरपाई ( Release innocent Nigerian youth from prison and pay compensation ) देण्याचे निर्देश राज्य सरकारला ( Mumbai High Court direction to pay damage to Nigerian youth ) दिले आहे.

करणी एटीएसची, भरणी नायजेरियन तरुणाला : मुंबईत एका नायजेरियन तरुणाला संशयास्पद गोळ्या आणि पावडरसह पकडण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर ड्रग्ज विक्रीचा खटला सुरू होता; मात्र एटीएसने सादर केलेल्या अहवालातील चुकीमुळे तरुणाला दीड वर्षे तुरुंगात राहावे लागले. आता मुंबई उच्च न्यायालयाने तरुणाची सुटका करून नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश दिले आहेत. एटीएसच्या म्हणण्यानुसार तरुणांकडे अंमली पदार्थ सापडले असून त्यात कोकेनही सापडले आहे. रासायनिक फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात जप्त केलेला माल कोकेन नसल्याचे आढळून आले. नायजेरियन तरुणांकडून जप्त करण्यात आलेल्या गोळ्या एनडीपीएस कायद्यांतर्गत येत नाहीत. एटीएसच्या न्यायालयात सादर करण्यात आलेल्या अहवालात टंकलेखनाची चूक होती, असे निरीक्षण न्यायमूर्ती यांनी नोंदवले आहे.

न्यायाधिशांची फिर्यादी पक्षाला फटकार - मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायमूर्ती भारती डांगरे यांना या प्रकरणातील एटीएसच्या अहवालात टायपिंमध्ये चूक झाल्याचे सरकारी वकिलांकडून सांगण्यात आले. त्यावर न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी फिर्यादी पक्षाला फटकारले आणि सांगितले की, महाराष्ट्र सरकारने नायजेरियन तरुणाच्या भरपाईबाबत 12 ऑगस्टपर्यंत निर्णय घ्यावा; अन्यथा न्यायालय नुकसानभरपाईची रक्कम ठरवेल. नायजेरियन तरुणाने दीड वर्षे गुन्ह्याशिवाय तुरुंगात काढले होते. त्यावर त्याने कोर्टात नुकसान भरपाईची मागणी केली होती.

काय आहे प्रकरण ?
ऑक्टोबर 2020 मध्ये दहशतवादविरोधी पथकाला ATS ला एक सूचना मिळाली होती की, एक नायजेरियन तरुण पवईच्या घोडबंदर रोडवर कोकेन आणि ड्रग्ज विकण्यासाठी आला होता. त्यानंतर एटीएसने सापळा रचून नायजेरियन तरुणाला अटक केली. एटीएसने सांगितले की, युवकाच्या झडतीदरम्यान 116.19 ग्रॅम कोकेन, 40.73 ग्रॅम केशर रंगाच्या गोळ्या आणि 4.41 ग्रॅम एक्स्टेसी गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्याना ताब्यात घेतल्यानंतर जप्ती साहित्य रासायनिक फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासण्याकरिता पाठवण्यात आले. तरुणांकडून सापडलेले अंमली पदार्थ कोकेन किंवा एक्स्टसी नसून ते लिडोकेन, टॅपंडॉल आणि कॅफिन असल्याचे रासायनिक तपासणीच्या अहवालात म्हटले आहे. फॉरेन्सिक लॅबच्या सहाय्यक संचालकांनी अहवालात लिडोकेन, टॅपंडॉल आणि कॅफीन एनडीपीएस कायद्यांतर्गत येत नसल्याचे लिहिले होते.

कनिष्ठ न्यायालयाचा तरुणा्च्या सुटकेस होता नकार- नायजेरियन तरुणाचे वकील अश्विनी आचारी यांनी तरुणाकडे सापडलेले ड्रग्ज एनडीपीएस कायद्यांतर्गत येत नसल्याचे सांगत कनिष्ठ न्यायालयात तरुणाच्या सुटकेची मागणी केली होती; परंतु 8 फेब्रुवारी 2021 रोजी सादर केलेल्या एटीएसच्या अहवालात अंमली पदार्थ सापडल्याचा दावा करत कनिष्ठ न्यायालयाने तरुणाची तुरुंगातून सुटका केली नाही. त्यानंतर नायजेरियन तरुणाने कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

हेही वाचा- Amrit Mahotsav of Independence गरिबांचा अन्नदाता असलेल्या पांडुरंग खानखोजेंनी देशाबाहेर राहून दिला स्वातंत्र्यांचा लढा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.