ETV Bharat / city

वाझे-हिरेन भेटीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर; हत्याकांडसंदर्भात पुढे आले मोठे खुलासे - मनसुख हिरेन हत्याकांड अपडेट

सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांच्या भेटीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. वालचंद हिराचंद मार्ग जंक्शन येथे दोघांची भेट झाल्याचा दावा एनआयए ने केला आहे. १७ फेब्रुवारीला रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी दोघांची भेट झाली होती.

CCTV
सचिन वाझे-मनसुख हिरेन यांच्या भेटीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर; वाचा हत्याकांडसंदर्भात 10 मोठे खुलासे
author img

By

Published : Mar 25, 2021, 2:29 PM IST

Updated : Mar 25, 2021, 4:26 PM IST

मुंबई - मनसुख हिरेन हत्याप्रकरणाच्या तपासाला वेग आलाय. या प्रकरणी एक नवीन सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. या सीसीटीव्हीमध्ये मनसूख हिरेन हा एका गाडीमध्ये बसताना दिसत आहे. हा व्हिडिओ 17 तारखेचा असून, गुन्हाची उकल होण्यास मदतीचा ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. वालचंद हिराचंद मार्ग जंक्शन येथे सचिन वाझे आणि मनसुख हिरेन या दोघांची भेट झाल्याचा दावा एनआयएने केला आहे. 17 फेब्रुवारीला रात्री 8 वाजून 25 मिनिटांनी दोघांची भेट झाली आहे.

वाझे-हिरेन भेटीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर; हत्याकांडसंदर्भात समोर आले मोठे खुलासे

हिरेन हत्याकांडासंदर्भात समोर आले मोठे खुलासे..

  • सचिन वाझेंनी व्हॉट्सअ‍ॅपवरुन 'तावडे' नामक व्यक्ती म्हणून मनसुखला फोन केला होता. दोघांमधील संवाद मनसुख यांची पत्नी विमला यांनी ऐकले होते.
  • 4 मार्च रोजी हिरेन मनसुख यांच्या तोंडावर क्लोरोफॉर्म मारून सुरुवातीला बेशुद्ध करण्यात आले होते. त्यानंतर त्याचे तोंड 3 ते 4 रुमालांनी पद्धतशीरपणे दाबून त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप एटीएसच्या तपासात करण्यात आलेला आहे. रात्री दहाच्या सुमारास मनसुखची हत्या झाली. त्यानंतर सचिन वाझे मुंबईत परतले आणि रात्री 11:48 वाजता डोंगरीच्या टिप्सी बारमध्ये छापेमारीचे नाटक रचले. जेव्हा मनसुखची हत्या झाली. तेव्हा सचिन वाझे हे एका ऑडीमध्ये बसले होते.
  • सीडीआर अहवालानुसार, सचिन वाझेंनी मनसुख हिरेनची हत्या केली. त्या दिवशी एकही फोन कॉल केला नाही. किंवा त्यांना इतर कोणाचाही फोन आला नाही. ते व्हॉट्सअ‍ॅपवरून कॉल करत होते.
  • सचिन वाझेंनी डोंगरी परिसरातील टिप्सी बार येथे छापे टाकण्याचे नाटक केले, जेणेकरुन मनसुख हिरेन हत्येच्या प्रकरणात काही चौकशी झाली. तर ते मुंबईच्या डोंगरी भागात असल्याचे सांगून तपासाची दिशा फिरवू शकले असते. टिप्सी बारच्या सीसीटीव्ही फुटेजमध्येही छापेमारीच्या वेळी सचिन वाझे उपस्थित असल्याचे समोर आले आहे.
  • ठाण्यातील घोडबंदरहून आल्यानंतर सचिन वाझे प्रथम मुंबई पोलीस मुख्यालयात गेले. त्यानंतर ते सीआययूच्या त्याच्या कार्यालयात गेले आणि मोबाईल चार्जिंगला लावला. जेणेकरुन त्यांचे लोकेशन आयुक्त कार्यालय असल्याचे दिसेल.
  • एटीएसला दिलेल्या जवाबात सचिन वाझे म्हणाले, की 4 मार्च रोजी ते दिवसभर मुंबई पोलीस मुख्यालयाच्या सीआययू कार्यालयात होते. मात्र, मोबाईल लोकेशननुसार ते दुपारी 12.48 वाजता चेंबूरच्या एमएमआरडीए कॉलनीत होते.
  • मनसुखकडे जो मोबाइल होता. त्यात दोन सिमकार्ड वापरण्यात आली होती. एटीएसने त्या दोन्ही क्रमांकांचे सीडीआर काढले. तेव्हा त्यांच्या एका क्रमांकावर मनसुखला अखेरचा त्यांच्या पत्नीचा फोन रात्री 8.32 वाजता आला होता. तसेच, दुसऱ्या क्रमांकावर रात्री 10.10 वाजता चार मेसेज आले होते. यावेळी त्यांच्या फोनचे लोकेशन वसईतील मालजीपाडा होते.
  • या प्रकरणात अटक झालेल्या विनायक शिंदे यांनी सांगितले, की वाझेंशी बोलण्यासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदी केलेल्या ११ सिमकार्ड्सचा वापर करण्यात आला होता. ही सिमकार्ड्स बुकी नरेश गोरे यांच्यामार्फत गुजरातमधून आणण्यात आली होती.
  • स्वतः सचिन वाझे यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकीचे पत्र लिहिले होते. मनसुख प्रकरणात अटक झालेल्या विनायक शिंदे यांच्या घरात काम करणाऱ्या चित्रकाराने हा खुलासा केला.
  • या कटामध्ये वाझेंनी मनसुखलाही सहभागी करून घेतले होते. याचा पुरावा एटीएस आणि एनआयएला सापडला आहे. जोपर्यंत एटीएस सचिन वाझेंची चौकशी करत नाही, तोपर्यंत एनआए याची पुष्टी करू शकत नाही. घाबरून की स्वेच्छेने मनसुख हिरेनने या कटात सहभाग घेतला होता, हे अद्याप स्पष्ट नाही. एटीएसला दोघांमधील कनेक्टिव्हिटीचा पुरावे मिळाले आहेत.

Last Updated : Mar 25, 2021, 4:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.