मुंबई - अँटिलिया विस्फोटकआणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आरोपी सुनील माने , संतोष शेलार आनंद ह्यांना मुंबईतील विशेष एनआयए कोर्टाने 25 जूनपर्यंत 'एनआयए' कोठडी सुनावली आहे. प्रदीप शर्मा यांच्यासोबत सुनील माने यांची समोरासमोर चौकशी करण्यासाठी एनआयएने मुंबईतील विशेष एनआयए कोर्टाकडे कोठडी मागितली आहे.
एनआयएची कोठडी
एनआयने, अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेणच्या हत्येसंदर्भात संतोष शेलार आणि आनंद नावाच्या दोन आरोपींना अटक केली होती. दोघांनाही न्यायालयात हजर केले असता, दोघांना 21 जूनपर्यंत एनआयएच्या कोठडीत पाठविण्यात आले होते. आनंदला महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातून अटक करण्यात आली होती. जिलेटीन प्रकरणात आनंदची भूमिका महत्वाची असल्याचे सांगितली जात आहे. तसेच, मनसुख हिरेन प्रकरणात संतोष शेलार आणि सुनील माने यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे. 'एनआयए'कडून कोर्टात आज सांगण्यात आले.
अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन खून प्रकरणाची चौकशी करणार्या एनआयएने आता विक्रोळी पोलीस ठाण्यातती मनसुखची कारबाबतची चौकशी स्वतःच्याकडे घेतली आहे. या प्रकरणात एनआयएने आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. यामध्ये माजी पोलीस अधिकारी सचिन वाजे, सुनील माने, रियाझुद्दीन काझी, विनायक शिंदे आणि क्रिकेट बुकी नरेश गोर यांचा समावेश आहे.
जिलेटीनचे प्रकरण गुन्हे शाखेकडे
एनआयएने आतापर्यंत केवळ दोन प्रकरणांची चौकशी केली होती. त्यामध्ये गांदेवी पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या अँटिलियाजवळ स्कॉर्पिओ कारमध्ये 20 जिलेटिन काड्यांचे प्रकरण गुन्हे शाखेच्या सीआययूकडे वर्ग करण्यात आले होते. त्यानंतर महाराष्ट्र एटीएसमध्ये बदली झाली. त्यानंतर महाराष्ट्र एटीएसने यापूर्वी मनसुख हिरेनच्या खूनाचा गुन्हा दाखल केला होता.