ETV Bharat / city

NIA Raids : महाराष्ट्रात टेरर फंडिंग प्रकरणी 20 जणांना अटक

author img

By

Published : Sep 22, 2022, 10:56 AM IST

Updated : Sep 22, 2022, 11:05 AM IST

महाराष्ट्रात टेरर फंडिंग ( terror funding case ) प्रकरणी 20 जणांना अटक करण्यात आली आहे. टेरर फंडिंग प्रकरणी देशभरात एनआयए, ईडीचे छापे सुरू आहेत.

NIA Raids
NIA ची मोठी कारवाई

मुंबई - महाराष्ट्रात टेरर फंडिंग ( terror funding case ) प्रकरणी 20 जणांना अटक करण्यात आली आहे. टेरर फंडिंग प्रकरणी देशभरात एनआयए, ईडीचे छापे सुरू आहेत. दरम्यान, दिल्लीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. पीएफआयचे अध्यक्ष परवेझसह त्याच्या भावाला येथून अटक करण्यात आली आहे. याशिवाय पीएफआयचे राष्ट्रीय सचिव व्हीपी नजरुद्दीन यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. एनआयएचे पथक त्यांना सोबत घेऊन गेले असल्याचे सांगण्यात आले. एनआयए देशातील 10 राज्यांमध्ये छापे टाकत आहे. यादरम्यान 100 हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

  • 4 offences filed in Mumbai, Nashik, Aurangabad & Nanded in various sections of IPC & UAPA for indulging in unlawful activities promoting enmity amongst communities & for conspiring to wage war against state. 20 PFI-linked accused arrested; probe underway: ATS Maharashtra (2/2)

    — ANI (@ANI) September 22, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

महाराष्ट्रात एटीएसचे छापे - महाराष्ट्र एटीएसने पीएफआयविरुद्ध चार स्वतंत्र गुन्हेही दाखल केले आहेत. महाराष्ट्र एटीएसचे छापे देखील आज संपूर्ण राज्यात सुरू असून त्यात औरंगाबाद, बीड, परभणी पर्व, मालेगाव, मुंबई नवी मुंबईचा समावेश आहे. एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, 20 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मौलाना सैफुर रहमान याला मालेगाव येथून ताब्यात घेण्यात आले आहे. सैफुर रहमान हे पीएफआयचे नाशिक जिल्हा अध्यक्ष आहेत.

NIA चा सर्वात मोठा छापा - अधिका-यांनी सांगितले की छाप्यादरम्यान NIA, ED ने दहशतवाद्यांना समर्थन केल्याच्या आरोपाखाली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ( Popular Front of India ) च्या 100 हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. अधिकार्‍यांच्या मते, हे छापे प्रामुख्याने दक्षिण भारतात टाकले जात आहेत. एनआयएने याला “आतापर्यंतची सर्वात मोठी तपास कारवाई म्हटले आहे. एनआयएने सांगितले की, दहशतवाद्यांना कथितपणे निधी पुरवणे, त्यांच्यासाठी प्रशिक्षणाची व्यवस्था करणे, प्रतिबंधित संघटनांमध्ये सामील होण्यासाठी लोकांना फसवणे यात गुंतलेल्यांच्या छुप्या ठिकाणांवर छापे टाकले जात आहेत.

100 कार्यकर्त्यांना ताब्यात - अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दहा राज्यांमध्ये छापे टाकले जात आहेत. यावेळी पीएफआयच्या प्रमुख नेत्यांसह सुमारे 100 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पीएफआयने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, “पीएफआयच्या राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक नेत्यांच्या घरांवर छापे टाकले जात आहेत. राज्य समिती कार्यालयावरही छापे टाकण्यात येत आहेत. आंध्र प्रदेशातून 5, आसाममधून 9, दिल्लीतून 3, कर्नाटकातून 20, केरळमधून 22, मध्य प्रदेशातून 4 महाराष्ट्रातून 20 जणांना अटक करण्यात आली आहे.

मध्य प्रदेशातील इंदूर, उज्जैन येथेही एनआयएचे छापे पडले असून त्यात पीएफआयच्या राज्य नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये एनआयएने मध्य प्रदेशातील उज्जैन, इंदूर येथून 4 नेत्यांना ताब्यात घेतले आहे. मध्य प्रदेशातील तळांवरून टेरर फंडिंग खाते, साहित्य जप्त करण्यात आले आहे.

Last Updated : Sep 22, 2022, 11:05 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.