ETV Bharat / city

New Pay Hike to ST Workers : एसटी कर्मचाऱ्यांना आजपासून नवीन पगारवाढ लागू; पाहा कोणाला किती मिळणार पगार? - एसटी कर्मचारी किती पगार मिळणार

राज्य सरकारने (State Government on ST Strike) एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटावा म्हणून पगारवाढ (ST Workers Pay Hike) आणि इतर सुविधा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आजपासून (7 डिसेंबर) एसटी महामंडळातील जे कर्मचारी संप काळात नियमित कामावर हजर राहिले, त्याच कर्मचार्‍यांना नवीन वेतन श्रेणीनुसार वेतन अदा करण्यात येत आहे.

st
एसटी बस
author img

By

Published : Dec 7, 2021, 4:53 PM IST

मुंबई - गेल्या एका महिन्यापासून सुरू असलेल्या एसटी कर्मचारी संपावर (ST Workers Strike) अद्यापही तोडगा निघाला नाही. मात्र, राज्य सरकारने (State Government on ST Strike) एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटावा म्हणून पगारवाढ (ST Workers New Pay Hike) आणि इतर सुविधा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आजपासून (7 डिसेंबर) एसटी महामंडळातील जे कर्मचारी संप काळात नियमित कामावर हजर राहिले, त्याच कर्मचार्‍यांना नवीन वेतन श्रेणीनुसार वेतन अदा करण्यात येत आहे. एसटी महामंडळाच्या या बंपर पगारवाढीमुळे आता एसटी संपात उभी फूट पडली असून, कामावर येणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

  • अशी आहे नवीन पगारवाढ -

नव्या पगारवाढीनुसार, नवीन कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सरासरी ५ हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे इतर भत्त्यासह त्यांच्या मूळ वेतनामध्ये ७ हजार २०० रुपये वाढ होतील. तर दहा वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये सरासरी ४ हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे इतर भत्त्यासह त्यांच्या मूळ वेतनात ५ हजार ७६० रुपये वाढ होतील. तसेच ज्या कर्मचाऱ्यांची २० वर्षे सेवा पूर्ण झाली आहे त्यांच्या मूळ वेतनात सरासरी २ हजार ५०० रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे इतर भत्त्यासह त्यांच्या वेतनात ३ हजार ६०० रुपयांची वाढ झाली आहे. ज्या कर्मचाऱ्यांची सेवा ३० वर्षे किंवा त्याहून जास्त झाली आहे त्यांच्या मूळ वेतनामध्ये सरासरी २ हजार ५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना इतर भत्त्यासह३ हजार ६०० रुपयांची वाढ मिळणार आहे. विलिनीकरणाचा मुद्दा हा हायकोर्टात असून, एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावं. पगारवाढ केल्यानंतरही काही कर्मचारी संप करत आहेत. अशा कर्मचाऱ्यांचा बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही. पैसे देऊनही संप चालू राहणार असल्यास काही अर्थ राहणार नाही, असे परिवहन मंत्री म्हणाले.

  • एसटीचा संपात उभी फूट-

एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या मागणीवरुन सुरु असलेला संप आता चांगलाच चिघळला आहे. तब्बल ३५ दिवस होऊनसुद्धा एसटीचा संप सुरूच आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. एसटी कर्मचारी बेकायदेशीर संपावर गेल्यामुळे एसटी महामंडळाने कारवाई सुरू केली आहे. महामंडळाने कर्तव्यावर रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरू केली. महामंडळाने आतापर्यंत रोजंदारीवरील १ हजार ९९० कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली असून, ९ हजार ६२५ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

  • एसटी महामंडळाला विश्वास -

निलंबनाच्या कारवाईनंतरही कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे महामंडळाने कारवाई अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे नियोजन केले आहे. मात्र, आता बंपर पगारवाढीमुळे संपात सहभागी होणारे कर्मचारी संप सोडून कर्तव्यावर हजर होत आहेत. सोमवारी राज्यभरात १८ हजार ८८८ कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले आहेत. तर ७३ हजार ३७८ कर्मचारी अजूनही प्रत्यक्षात संपात सहभागी होते. मात्र, आता एसटी महामंडळाने आजपासून नवीन वेतनवाढीनुसार वेतन देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात कर्मचारी कामावर हजर होणार असल्याचा विश्वास एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.