मुंबई - राज्यातील काही जिल्ह्यांत टाळेबंदी घोषित केली असली तरी कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. सलग चौथ्या दिवशी आठ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची संख्या नोंदवली गेली आहे. राज्यात आज ५ हजार ३०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
कोरोनाचे नवीन ८ हजार ३४८ नवीन रुगण आढळले आहेत. सध्या राज्यात १ लाख २३ हजार ३७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १५ लाख २२ हजार ५६४ नमुन्यांपैकी ३ लाख ९३७ नमुने पॉझिटिव्ह (१९.७६ टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख ४० हजार ८८४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४५ हजार ५५२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यातील कोरोनाचा मृत्यूदर ३.८५ टक्के
राज्यात आज १४४ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या, राज्यातील मृत्यूदर ३.८५ टक्के एवढा आहे.हे मृत्यू मुंबई मनपा-६५, ठाणे-१, नवी मुंबई मनपा-१, कल्याण-डोंबिवली मनपा-६,उल्हासनगर मनपा-१, भिवंडी-निजामपूर मनपा-३, वसई-विरार मनपा-८, रायगड-१, नाशिक-२, नाशिक मनपा-२, धुळे मनपा-१, जळगाव-१, पुणे-९, पुणे मनपा-१६ या भागातील आहेत. याचबरोबर मृतामधील रुग्ण पिंपरी-चिंचवड मनपा-७,सोलापूर-१, सोलापूर मनपा-४, रत्नागिरी-५, औरंगाबाद मनपा-४, लातूर-१, उस्मानाबाद-१, अमरावती-१, अमरावती मनपा-१, बुलढाणा-२ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहेत. दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.५ टक्के आहे.
राज्यातील जिल्हानिहाय उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या
रुग्णांचा तपशील*
मुंबई: बाधीत रुग्ण- (१,००,३५०), बरे झालेले रुग्ण- (७०,४९२), मृत्यू- (५६५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३,९१७)
ठाणे: बाधीत रुग्ण- (७३,२८९), बरे झालेले रुग्ण- (३४,०१७), मृत्यू- (१९६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३७,२९५)
पालघर: बाधीत रुग्ण- (११,५६६), बरे झालेले रुग्ण- (६२४१), मृत्यू- (२३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५०९१)
रायगड: बाधीत रुग्ण- (१०,८४१), बरे झालेले रुग्ण- (५७३३), मृत्यू- (२११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८९५)
रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (११२५), बरे झालेले रुग्ण- (६८६), मृत्यू- (४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३९९)
सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (२७१), बरे झालेले रुग्ण- (२२९), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३७)
पुणे: बाधीत रुग्ण- (५१,५७५), बरे झालेले रुग्ण- (१८,८८१), मृत्यू- (१३१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३१,३८०)
सातारा: बाधीत रुग्ण- (२२५४), बरे झालेले रुग्ण- (१२१७), मृत्यू- (७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (९६१)
सांगली: बाधीत रुग्ण- (८७०), बरे झालेले रुग्ण- (४४०), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४०९)
कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (१८६५), बरे झालेले रुग्ण- (९०४), मृत्यू- (२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९३२)
सोलापूर: बाधीत रुग्ण- (५३१८), बरे झालेले रुग्ण- (२४३३), मृत्यू- (३८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५०२)
नाशिक: बाधीत रुग्ण- (८९६८), बरे झालेले रुग्ण- (५०८५), मृत्यू- (३७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५२६)
अहमदनगर: बाधीत रुग्ण- (१२२०), बरे झालेले रुग्ण- (७०५), मृत्यू- (३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८२)
जळगाव: बाधीत रुग्ण- (७१६६), बरे झालेले रुग्ण- (४५१५), मृत्यू- (३८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२६९)
नंदूरबार: बाधीत रुग्ण- (३६०), बरे झालेले रुग्ण- (१७२), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१७२)
धुळे: बाधीत रुग्ण- (१८१४), बरे झालेले रुग्ण- (१२२७), मृत्यू- (८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (५०३)
औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (९४५५), बरे झालेले रुग्ण- (५२३४), मृत्यू- (३६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३८५७)
जालना: बाधीत रुग्ण- (१२९८), बरे झालेले रुग्ण- (६६१), मृत्यू- (५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५८३)
बीड: बाधीत रुग्ण- (३२३), बरे झालेले रुग्ण- (१५२), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (१६३)
लातूर: बाधीत रुग्ण- (१०१५), बरे झालेले रुग्ण- (४३४), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५३३)
परभणी: बाधीत रुग्ण- (३०९), बरे झालेले रुग्ण- (१५७), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४५)
हिंगोली: बाधीत रुग्ण- (३८७), बरे झालेले रुग्ण- (२९५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८९)
नांदेड: बाधीत रुग्ण- (७८०), बरे झालेले रुग्ण (४०३), मृत्यू- (३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३४३)
उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (४८१), बरे झालेले रुग्ण- (२९६), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६१)
अमरावती: बाधीत रुग्ण- (११२७), बरे झालेले रुग्ण- (७३७), मृत्यू- (४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३४५)
अकोला: बाधीत रुग्ण- (२०१८), बरे झालेले रुग्ण- (१६२३), मृत्यू- (९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९८)
वाशिम: बाधीत रुग्ण- (२३१४), बरे झालेले रुग्ण- (१३४), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१७५)
बुलढाणा: बाधीत रुग्ण- (४८२), बरे झालेले रुग्ण- (२२५), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३५)
यवतमाळ: बाधीत रुग्ण- (५०८), बरे झालेले रुग्ण- (३४९), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४३)
नागपूर: बाधीत रुग्ण- (२४८३), बरे झालेले रुग्ण- (१४२८), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०३०)
वर्धा: बाधीत रुग्ण- (६६), बरे झालेले रुग्ण- (३३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३१)
भंडारा: बाधीत रुग्ण- (१७९), बरे झालेले रुग्ण- (१००), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७७)
गोंदिया: बाधीत रुग्ण- (२२५), बरे झालेले रुग्ण- (१८६), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६)
चंद्रपूर: बाधीत रुग्ण- (२१४), बरे झालेले रुग्ण- (१३४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८०)
गडचिरोली: बाधीत रुग्ण- (१७३), बरे झालेले रुग्ण- (१०५), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६७)
इतर : बाधीत रुग्ण- (२४८), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१६)
एकूण: बाधीत रुग्ण-(३,००,९३७), बरे झालेले रुग्ण-(१,६५,६६३), मृत्यू- (११,५९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०१),ॲक्टीव्ह रुग्ण-(१,२३,३७७)
दरम्यान, ग्रामीण भागात महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना आज दिल्या आहेत. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळल्याने नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज निर्माण झाली आहे.