मुंबई - देशात आज 18313 कोरोना रुग्णांची ( Corona patient ) नोंद करण्यात आली आहे. तर 57 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार 20742 रुग्णांना घरी सोडण्यात ( Corona patient discharges ) आले. तर 1,45,026 वर सक्रिय रुग्ण आहे. आणि सकारात्मकता दर 4.31 टक्के इतका आहे.
-
#COVID19 | India reports 18,313 fresh cases, 20,742 recoveries and 57 deaths in the last 24 hours.
— ANI (@ANI) July 27, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Active cases 1,45,026
Daily positivity rate 4.31% pic.twitter.com/LEWYIOj8qR
">#COVID19 | India reports 18,313 fresh cases, 20,742 recoveries and 57 deaths in the last 24 hours.
— ANI (@ANI) July 27, 2022
Active cases 1,45,026
Daily positivity rate 4.31% pic.twitter.com/LEWYIOj8qR#COVID19 | India reports 18,313 fresh cases, 20,742 recoveries and 57 deaths in the last 24 hours.
— ANI (@ANI) July 27, 2022
Active cases 1,45,026
Daily positivity rate 4.31% pic.twitter.com/LEWYIOj8qR
मुंबईत २६३ कोरोनाचे नवे रुग्ण - मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली होती. जूननंतर रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. आज २६३ रुग्णांची तर १ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या १९२ बेडवर रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
मुंबईत गेल्या २४ तासात ७ हजार ६०१ चाचण्या करण्यात आल्या. त्यात २६३ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. आज १ मृत्यूंची नोंद झाली आहे. २८३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख २३ हजार ३५१ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख १ हजार ९०२ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १ हजार ८०५ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी २९७५ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०२४ टक्के इतका आहे.
200 कोटी कोविड लसीकरणाचा आकडा गाठला - कोरोना व्हायरस सोबतच्या (CoronaVirus) युद्धात भारताने नवे स्थान प्राप्त केले आहे. देशाने 200 कोटी लसीकरणाचा आकडा गाठला आहे. भारताने अवघ्या 18 महिन्यांत हा आकडा पार केला. 16 जानेवारी 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते कोरोनाचे लसीकरण सुरू करण्यात आले. देशात आता 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना बूस्टर डोस (Booster Dose) दिला जात आहे, तर 12 वर्षांखालील मुलांनाही लसीकरण केले जात आहे. केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली देशात कोरोना प्रतिबंधासाठी कोरोना लसीकरणाची मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात आली. ज्या अंतर्गत भारताने 200 कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे. महामारीशी झुंज देत 299 कोटी लसीकरणाचे यश संपादन केल्याबद्दल भारताचे जगभरातून कौतुक होत आहे.
सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत - राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 1826 सक्रिय रुग्ण आहेत. तर पुण्यात 4989 सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 987 सक्रिय रुग्ण आहेत. पालघर 164, रायगड 353, रत्नागिरी 40, सिंधुदुर्ग 87, सातारा 189, सांगली 211, कोल्हापूर 152, सोलापूर 315, नाशिक 712, अहमदनगर 475, जळगाव 55, धुळे 120, औरंगाबाद 314, जालना 148, बीड 64, लातूर 200, नांदेड 44, उस्मानाबाद 232, अमरावती 122, अकोला 83, वाशिम 197, बुलढाणा 164, यवतमाळ 100, नागपूर 1492, वर्धा 91, भंडारा 211, गोंदिया 75, गडचिरोली 51 आणि चंद्रपूरमध्ये 115 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रिय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 14534 सक्रिय रुग्ण आहेत.
हेही वाचा - ईडीला अटक आणि जप्तीचा अधिकार आहे का? पीएमएलएतील तरतुदींवर आज सर्वोच्च न्यायालयात निर्णय