मुंबई - मुंबईत आज (२१ जानेवारी) ५००८ नवे रुग्ण (Mumbai New Corona Cases) आढळून आले आहेत. तर १२ मृत्यूची (Corona Death) नोंद झाली आहे. आज १२,९१३ रुग्णांना डिस्चार्ज (Patients Discharged) देण्यात आला आहे.
आतापर्यंत एकूण १० लाख २८ हजार ७१५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ९ लाख ९५ हजार ३३८ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ५१२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १४ हजार १७८ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ९३ दिवस इतका आहे. मुंबईमधील ४४ इमारती सील आहेत. १४ जानेवारी ते २० जानेवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर ०.७२ टक्के इतका आहे.
मुंबईत डिसेंबर महिन्यापासून कोरोना (Mumbai Corona) विषाणूची तिसरी लाट (Corona Third Wave) आली आहे. जानेवारीच्या सुरुवातीला ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होऊन सोमवारी ५९५६ रुग्णांची नोंद झाली. मंगळवारी त्यात किंचित वाढ होऊन ६१४९ तर बुधवारी ६०३२ रुग्णांची नोंद झाली. गुरुवारी त्यात किंचित घट होऊन ५७०८ रुग्णांची नोंद झाली. आज त्यात आणखी घट होऊन ५००८ रुग्णांची नोंद झाली आहे. १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्या घटत असल्याने सध्या १४ हजार १७८ सक्रिय रुग्ण आहेत.
- ५००८ नव्या रुग्णांची नोंद -
मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान दिवसाला २८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे दिवसाला ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे.
- ८२.७ टक्के बेड रिक्त -
मुंबईत आज आढळून आलेल्या ५००८ रुग्णांपैकी ४२०७ म्हणजेच ८४ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. आज ४२० रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. ८८ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये ३७,८०१ बेडस असून त्यापैकी ४५७१ बेडवर म्हणजेच १२.१ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ८७.९ टक्के बेड रिक्त आहेत.
- रुग्णसंख्येत चढउतार -
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ११ हजारावर गेली होती. जूनपासून त्यात घट होऊ लागली. १ डिसेंबरला कोरोनाचे १०८ नवे रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर त्यात वाढ हाऊ लागली. ६ जानेवारीला २०,१८१, ७ जानेवारीला २०,९७१, ८ जानेवारीला २०,३१८, त्यानंतर रुग्णसंख्या घटली असून ९ जानेवारीला १९४७४, १० जानेवारीला १३६४८, ११ जानेवारीला ११६४७, १२ जानेवारीला १६४२०, १३ जानेवारीला १३७०२, १४ जानेवारीला ११३१७, १५ जानेवारीला १०६६१, १६ जानेवारीला ७८९५, १७ जानेवारीला ५९५६, १८ जानेवारीला ६१४९, १९ जानेवारीला ६०३२, २० जानेवारीला ५७०८, २१ जानेवारीला ५००८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
- नऊ वेळा शून्य मृत्यूची नोंद -
मुंबईमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात १ ते ६ मृत्यूंची नोंद झाली होती. १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबरला, २ जानेवारीला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.
- धारावीत २९ सक्रिय रुग्ण -
मुंबईतील धारावी ही सर्वात मोठी झोपडपट्टी कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान हॉटस्पॉट ठरली होती. पहिल्या लाटे दरम्यान सर्वाधिक ९४, तर दुसऱ्या लाटेदरम्यान ९९ रुग्ण आढळून आले होते. धारावीत गेले काही महिने कोरोनाचे १ ते ५ रुग्ण आढळून येत होते. मात्र मुंबईत रुग्णसंख्या वाढू लागल्यावर धारावीतही रुग्णसंख्या वाढू लागली. ७ जानेवारीला १५० तर ८ जानेवारीला १४७ सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होत गेली. आज २१ जानेवारीला २९ रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीत आतापर्यंत ८५३८ रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी ७९२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून १९४ सक्रिय रुग्ण आहेत.
हेही वाचा - Schools Reopen Mumbai :...म्हणून मुंबईतील शाळा २७ जानेवारीपासून सुरु होणार - सुरेश काकाणी