ETV Bharat / city

Mumbai Corona Update मुंबईत ६८३ नवे कोरोना रुग्ण, १ मृत्यूची नोंद - मुंबई कोरोना अपडेट

मुंबईत गेल्या २४ तासात ८,२४७ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ६८३ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. आज शून्य मृत्यूंची नोंद झाली आहे. ४०९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख २९ हजार ९६८ रुग्णांची नोंद झाली आहे.

corona
corona
author img

By

Published : Aug 11, 2022, 8:30 PM IST

मुंबई मुंबईत गेले अडीच वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या चार लाटा येऊन गेल्या. कोरोनाचा प्रसार आटोक्यात आल्याने जूननंतर रुग्णांच्या संख्येत घट होऊन ३०० च्या दरम्यान रुग्णसंख्या नोंद होत होती. त्यात वाढ होऊन ३ ऑगस्ट पासून १० ऑगस्ट दरम्यान ४०० हुन अधिक रुग्ण आढळून आले. काल ११ ऑगस्टला त्यात वाढ होऊन ८५२ नव्या रुग्णांची नोंद झाली. आज गुरुवारी त्यात घट होऊन ६८३ रुग्णांची नोंद झाली आहे. आज १ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या २७७ बेडवर रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

६८३ नवे रुग्ण मुंबईत गेल्या २४ तासात ८,२४७ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ६८३ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. आज शून्य मृत्यूंची नोंद झाली आहे. ४०९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख २९ हजार ९६८ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख ६ हजार ४८८ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३,८१८ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १७९५ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०३९ टक्के इतका आहे.

रुग्णसंख्या वाढली मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून २३ जूनला २४७९ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊन १८ जुलैला १६७ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली. २ ऑगस्टला ३२९, ३ ऑगस्टला ४३४, ४ ऑगस्टला ४१०, ५ ऑगस्टला ४४६, ६ ऑगस्टला ४८६, ७ ऑगस्टला ४६५, ८ ऑगस्टला ४०७, ९ ऑगस्टला ४७९, १० ऑगस्टला ८५२, ११ ऑगस्टला ६८३ रुग्णांची नोंद झाली आहे.

११५ वेळा शून्य मृत्यूची नोंद मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण ११५ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा, मे महिन्यात २८ वेळा, जून महिन्यात ७ वेळा, जुलै महिन्यात ६ वेळा तर ऑगस्ट महिन्यात ३ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.