मुंबई - राज्यात आज कोरोनाचे रुग्ण घटले असून 318 बाधितांची नोंद तर एकाचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक 54 रुग्ण मुंबईत असून त्यापाठोपाठ पुण्याचा नंबर आहे. ओमयक्रोनचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, असे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने म्हणणे आहे.
- दिवसभरात 318 बाधित; एकाचा मृत्यू -
राज्यात कोरोना उतरणीला लागला असला तरी रुग्ण संख्येत चढ- उतार दिसून येत आहेत. आज 318 रुग्ण सापडले. तर 1 जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर 1.82 टक्के इतका स्थिर स्थावर आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील 98.9 टक्के आहे. दिवसभरात 355 रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत 77 लाख 19 हजार 949 रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत.
कोविड निदानासाठी आजपर्यंत 7 कोटी 85 लाख 28 हजार 186 चाचण्या केल्या. त्यापैकी 10.02 टक्के इतके म्हणजेच 78 लाख 70 हजार 627 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 18 हजार 633 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये तर 566 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 2925 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेला ओमयक्रोनचा आज एकही रुग्ण सापडलेला नाही, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
- विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण -
मुंबई महापालिका - 54
ठाणे - 2
ठाणे मनपा - 11
नवी मुंबई पालिका - 6
कल्याण डोबिवली पालिका - 2
मीरा भाईंदर - 1
वसई विरार पालिका - 1
नाशिक - 4
नाशिक पालिका - 1
अहमदनगर - 21
अहमदनगर पालिका - 5
पुणे - 50
पुणे पालिका - 47
पिंपरी चिंचवड पालिका - 26
सातारा - 11
नागपूर मनपा - 2