ETV Bharat / city

New Chief Secretary : देबाशीष चक्रवर्ती राज्याचे नवीन मुख्य सचिव - Maharshtra Government

सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांच्या प्रस्तावाला मंजुरी न मिळाल्याने देबाशीष चक्रवर्ती (Debashish Chakraborty) यांची मुख्य सचिव पदी वर्णी लागली आहे. देबाशीष चक्रवर्ती (Debashish Chakraborty) हे १९८६ च्या बॅचचे अधिकारी आहेत.

Debashish Chakraborty
New Chief Secretary
author img

By

Published : Nov 30, 2021, 6:29 PM IST

Updated : Nov 30, 2021, 6:59 PM IST

मुंबई - राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे (Chief Secretary Sitaram Kunte) यांच्या मुदतवाढीला केंद्र सरकारने नकारघंटा दर्शवल्याने मुख्य सचिव पदी देबाशीष चक्रवर्ती (Debashish Chakraborty) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चक्रवर्ती हे १९८६ च्या बॅचचे अधिकारी आहेत. दरम्यान, विविध मुद्द्यांवरून राज्य सरकारने केंद्राला जेरीस आणले आहे. कुंटे यांची मुदतवाढ नाकारून केंद्राने राज्य सरकारचा वचपा काढल्याचे बोलले जात आहे.

चक्रवर्ती यांनी पदभार स्वीकारला
राज्याचे मुख्य सचिव असलेले सीताराम कुंटे यांचा कार्यकाळ ३० नोव्हेंबरला म्हणजेच आज संपुष्टात आला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, आगामी निवडणुका आदी मुद्द्यांमुळे कुंटे यांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळावी, अशा स्वरूपाचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारला पाठवला होता. केंद्राने मात्र कुंटे यांना मुदतवाढ देण्यास नकार दर्शवला. मुख्य सचिव पदाच्या रेसमध्ये असलेल्या देबाशीष चक्रवर्ती यांची मुख्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. चक्रवर्ती यांनी आज संध्याकाळी कुंटे यांच्याकडून मुख्य सचिव पदाचा पदभार स्वीकारला.

राज्य सरकारला धक्का
मुख्य सचिवपदी असलेले सीताराम कुंटे यांच्यानंतर वंदना कृष्णा या १९८५ च्या बॅचच्या सनदी अधिकारी सेवा जेष्ठतेनुसार प्रशासनात अग्रेसर आहेत. तर दुसऱ्या स्थानावर देबाशीष चक्रवर्ती होते. ते देखील १९८६ च्या बॅचचे अधिकारी आहेत. दोघांचा ही कार्यकाळ फेब्रुवारी २०२२ मध्ये संपुष्टात येणार आहे. त्यामुळे कुंटे यांचा कार्यकाळ वाढवून मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, केंद्राने मुदतवाढ नाकारून चक्रवर्ती यांच्या पदभार सोपवत राज्य सरकारला जोरदार धक्का दिला आहे.

मुदतवाढीला लगाम
फडणवीस सरकारच्या काळात तत्कालीन मुख्य सचिव अजोय मेहता यांना दोनवेळा मुख्य सचिव पदी मुदतवाढ देण्यात आली होती. एकदा सहा महिन्यांची आणि दुसऱ्यांदा तीन महिन्यांची मुदतवाढ केंद्राने दिली होती. जून २०२० ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत संजय कुमार हे मुख्य सचिव राहिले. मार्च २०२१ पासून सीताराम कुंटे यांनी मुख्य सचिव पदाची सूत्रे हाती घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विश्वासू अधिकाऱ्यांपैकी ते एक होते. राज्यात आणि मुंबईत कोरोनाचे संकट असताना चोख कामगिरी बजावली होती. आता तिसरी लाट येणार असल्याने कुंटे यांना मुदतवाढ द्यावी असा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्राला पाठवला होता. मात्र केंद्राने त्याला नामंजूरी दिली.

हेही वाचा - Mamta Banerjee Mumbai Visit : उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांची भेट नाहीच, आदित्य ठाकरेंची घेणार भेट

Last Updated : Nov 30, 2021, 6:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.