ठाणे : भिवंडी न्यायलयाच्या परिसरात असणाऱ्या संरक्षण भिंतीलगत कचराकुंडीत पाच ते सहा तासांचे स्त्री जातीचे अर्भक मृतावस्थेत ( Bhiwandi New Born Baby Dead ) आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर घटना निदर्शनास आल्यावर पोलिस शिपाई सतीश वाघ यांनी ही माहिती पोलिस ठाण्यात दिली. याप्रकरणी भादंविच्या कलम ३१७ अन्वये अज्ञात महिलेविरोधात ( Police Regiester Case Women ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाच ते सहा तासाच्या एका नवजात स्त्री जातीच्या अर्भकास प्लास्टिकच्या गोणीमध्ये एका हिरव्या रंगाच्या कपड्यात गुंडाळून भिवंडी न्यायालयाच्या भिंतीलगत असलेल्या कचराकुंडीत फेकण्यात ( Bhiwandi New Born Baby Dead ) आले. त्यानंतर या अज्ञात महिलेने तेथून पळ काढला. नुकतंच जन्माला आलेले हे अर्भक मृत अवस्थेत आढळून आले आहे.
अनैतिक संबंध लपवण्याचा हेतूने...
कचरा कुंडीत मृतावस्थेत सापडलेले हे नवजात स्त्री-जातीचे अर्भक ( Bhiwandi New Born Baby Dead ) पालनपोषण नाकारण्याच्या अथवा अनैतिक संबंध लपवण्याचा हेतूने फेकण्यात आल्याचा दाट संशय पोलिसांना संशय आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वपोनि शितल राऊत करत आहे.
हेही वाचा - NCP-Shiv Sena Dispute : जळगावात राजकीय पारा वाढला; शिवसैनिक अंगावर धावून आल्याचा रोहिणी खडसेंचा आरोप