मुंबई - आज राज्यात २,२९४ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १९,९४,९७७ वर पोहचला आहे. राज्यात आज ५० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ५०,५२३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.५३ टक्के एवढा आहे. राज्यात आज एकूण ४८,४०६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९८ टक्के -
राज्यात आज ४,५१६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण १८,९४,८३९ कोरोना बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९८ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३८,९५,२७७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,९४,९७७ नमुने म्हणजेच १४.३६ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २,१८,०५८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून राज्यात एकूण ४८,४०६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
हेही वाचा - राम कदम यांना उपोषणस्थळावरून पोलिसांनी घेतले ताब्यात
हेही वाचा - कोल्हापूरातलं भन्नाट गाव ! 10 माजी सरपंच-उपसरपंचांना मतदारांनी बसवले घरी