मुंबई - राज्यात कोरोनाचे रुग्ण संख्या घटली आहे. दिवसभरात 2 हजार रुग्ण ( 2 thousand corona cases in MH ) सापडले आहेत. तर दुसरीकडे मृतांचा आकडादेखील कमालीचा घटला आहे. आज केवळ 15 जण ( 15 corona patients deaths ) दगावले आहेत, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.
राज्यात मागील दोन दिवसांपासून रुग्णांची संख्या स्थिर आहे. बुधवारी 2 हजार 748, गुरुवारी 2 हजार 797 बाधितांची नोंद झाली होती. तर आज 2 हजार 68 रुग्ण आढळून आले आहेत. मृत्यू संख्यादेखील कमी झाली आहे. कोरोनाने आज 15 जण दगावले आहेत. गुरुवारी 40 जणांचा मृत्यू झाला होता. 4 हजार 709 रुग्ण बरे झाले आहेत. तर बरे होण्याचे प्रमाण 97.85 टक्के आहे. गुरुवारी 97.82 आणि बुधवारी हे प्रमाण 99.77 टक्के इतके होते.
कोरोनाचे 21 हजार 159 सक्रिय रुग्ण
आजपर्यंत 7 कोटी 70 लाख 1 हजार 972 कोविड चाचण्या केल्या आहेत. त्यापैकी 10.20 टक्के इतके म्हणजेच 78 लाख 55 हजार 359 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 37 हजार 252 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 1139 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. कोरोनाचे 21 हजार 159 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
ओमायक्रोनचा एकही रुग्ण नाही
कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेला ओमयक्रोनचे गेले दोन दिवस एकही रुग्ण सापडला नाही. बुधवारी 111 तर मंगळवारी 351 रुग्ण सापडले होते. आजपर्यंत 4 हजार 456 एवढे रुग्ण बाधित झाले आहेत. तर 3531 जणांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याने सर्वांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत 8904 जणांची जनुकीय चाचणी केली. 7991 चाचण्याचे अहवाल प्राप्त झाले आहे. त्यातील 913 नमुने प्रलंबित आहेत, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
या विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण -
मुंबई महापालिका - 202
ठाणे - 18
ठाणे मनपा - 38
नवी मुंबई पालिका - 32
कल्याण डोबिवली पालिका - 7
मीरा भाईंदर - 18
वसई विरार पालिका - 8
नाशिक - 91
नाशिक पालिका - 22
अहमदनगर - 162
अहमदनगर पालिका - 51
पुणे - 113
पुणे पालिका - 322
पिंपरी चिंचवड पालिका - 142
सातारा - 40
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण
आज 4,709 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 76,86,670 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) 97.85 टक्के ( Corona recovery rate in Maharashtra ) एवढे झाले आहे.