मुंबई : मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. ८ जूनला १७६५, ९ जूनला १७०२ रुग्णांची नोंद झाली. आज त्यात वाढ होऊन १९५६ रुग्णांची नोंद झाली आहे. आज शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या ९१९१ सक्रिय रुग्ण (Active Corona Patients) आहेत. मुंबईत गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
१९६५ नवे कोरोना रुग्ण : मुंबईत कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबईत गेल्या २४ तासांत १५ हजार ३४६ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १९५६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. ७६३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ७७ हजार १९९ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ४८ हजार ४३८ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.१०७ टक्के इतका आहे. मुंबईत आज आढळून आलेल्या १९५६ रुग्णांपैकी १८७३ म्हणजेच ९६ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ९४३ बेड्स असून, त्यापैकी ३६९ बेडवर रुग्ण आहेत.
रुग्णसंख्या वाढतेय : मुंबईत गेली दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. मार्च-एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. मे महिन्याच्या अखेरीस ३१ मे ला ५०६, १ जूनला ७३९, २ जूनला ७०४, ३ जूनला ७६३, ४ जूनला ८८९, ५ जूनला ९६१, ६ जूनला ६७६, ७ जूनला १२४२, ८ जूनला १७६५, १७०२, ९ जून ला १९५६ रुग्णांची नोंद झाली आहे.
शून्य मृत्यूची नोंद : मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण १०५ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा, तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा, मे महिन्यात २८ वेळा, तर जून महिन्यात ६ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.
हेही वाचा : मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचे कारण दोन दिवसात स्पष्ट होणार, कोरोना वाढल्यास मास्क सक्तीचे सूतोवाच