नवी मुंबई - नवी मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. नवी मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांचा साडेचार हजारांचा आकडा पार आहे. त्यात नवे 124 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनामुळे नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक म्हणजे 84 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
गेल्या 10 ते 12 दिवसांत नवी मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. हे वाढलेले रुग्ण प्रशासनाच्या चिंतेत भर टाकत आहेत. आजपर्यंत नवी मुंबईत 4 हजार 526 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. यांपैकी 11 रुग्ण हे नवीन मुंबईबाहेरील रहिवासी होते.
- नवी मुंबईत 16 हजार 329 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 11 हजार 118 जण निगेटिव्ह आले आहेत, तर 696 जणांचे तपासणी अहवाल येणे प्रलंबीत आहे.
- नवी मुंबई शहरात राहणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 4 हजार 515 इतकी आहे. यामध्ये तुर्भेतील 13, बेलापूरमधील 4, कोपरखैरणे 44, नेरुळ 18, वाशी 8, घणसोली 10, ऐरोली 20 व दिघ्यातील 7, असे एकूण 124 नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये 42 स्त्रिया व 82 पुरुषांचा समावेश आहे.
- नवी मुंबईत 2 हजार 603 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यात बेलापूरमधील 11, नेरुळ 15, वाशी 5, तुर्भे 16, कोपरखैरणे 4, घणसोली 17,ऐरोली 13 व दिघा 3 अशा एकूण 84 व्यक्ती कोरोना मुक्त झाल्या आहेत. यामध्ये 31 स्त्रिया आणि 53 पुरुषांचा समावेश आहे.
शहरात 1 हजार 765 व्यक्तींवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत, तर आजतागायत एकूण 147 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.