ETV Bharat / city

'कोरोना लसीबाबत जनजागृतीची गरज, लोकप्रतिनिधींनीही लस घ्यावी' - covid case in india

केंद्र सरकारने कोरोना विषाणूबाबतच्या दोन लसीना मान्यता दिली आहे.

corona vaccine
कोरोना लस
author img

By

Published : Jan 4, 2021, 5:33 PM IST

मुंबई - केंद्र सरकारने कोरोना विषाणूबाबतच्या दोन लसीना मान्यता दिली आहे. मात्र लसीबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असल्याने सरकार आणि महापालिकेने नागरिकांमध्ये जनजागृती करावी. तसेच नागरिकांमध्ये लसी बाबत असलेली भीती दूर करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत लोकप्रतिनिधींनीही लस घ्यावी. असे केल्याने नागरिकांमध्ये चांगला संदेश जाईल आणि लसीकरणाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल, असे नेटस्केप इंडिया व वी डॉक्टर कॅम्पेनच्या डॉ. सुनीता दुबे यांनी म्हटले आहे.

डॉ. सुनीता दुबे

डॉक्टरांकडून स्वागत -

भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यावर मार्चपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला. गेले नऊ महिने देशभरात कोरोना विषाणू विरोधात युद्ध सुरू आहे. कोरोना विषाणू विरोधातील हे युद्ध अंतिम टप्प्यात आले आहे. केंद्र सरकारने दोन लसीना मान्यता दिली आहे. या दोन्ही लसी भारतात बनल्या असल्याने त्याचे स्वागत नेटस्केप इंडिया व वी डॉक्टर कॅम्पेनने केले आहे. त्याच बरोबर देशभरात जी लसीकरण मोहिम राबवली जाणार आहे. या मोहिमेत आम्ही सर्व डॉक्टर सहभागी होणार आहोत ,असे सुनीता दुबे यांनी यांनी सांगितले.

लोकप्रतिनिधींनी लस घ्यावी -

कोरोना लसी संदर्भात नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण झाले आहेत. ही लस कधी मिळणार, लस किती रुपयांना मिळणार, लस घेतल्यावर कोरोना होणार नाही का असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. या प्रश्नांची उत्तरे नागरिकांना मिळण्यासाठी सरकारने जनजागृती करण्याची गरज आहे, असे मत डॉ. सुनीता दुबे यांनी व्यक्त केले आहे. नागरिकांमध्ये लसीबाबत मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने या संदर्भात नागरिकांमध्ये असलेला संभ्रम दूर करणे अपेक्षित आहे. त्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत लोकप्रतिनिधींनी लस घेतल्यास त्याचा चांगला संदेश नागरिकांमध्ये जाऊन लसीकरण मोहीम तळागाळापर्यंत राबवणे शक्य होणार आहे, असे सुनीता दुबे म्हणाल्या.

लसीची शाश्वती किती? -

भारतात आतापर्यंत ज्या आजारावर लसी देण्यात आल्या त्याची १०० टक्के शाश्वती देण्यात येत होती. मात्र कोरोना संदर्भात देण्यात येणाऱ्या लसी या ६० ते ७० टक्के शाश्वती असणाऱ्या आहेत. एक लस १०० रुपयांना तर एक लस ४०० रुपयांना मिळणारी आहे. या लसी दिल्याने पुन्हा कोरोना होणार नाही का याची माहितीही डॉक्टरांना आणि नागरिकांना नसल्याने लसी बाबत विविध प्रश्न निर्माण होत आहेत. या प्रश्नांची उत्तरे मिळणे नागरिकाना अपेक्षित आहे.

हेही वाचा- संभाजी महाराजांचे नाव पुणे जिल्ह्याला द्यावे - प्रकाश आंबेडकर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.