मुंबई - एनडीएच्या राष्ट्रपती पदाचा उमेदवार द्रौपदी मुर्मू ( NDA presidential candidate Draupadi Murmu ) आज मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. मुंबईत द्रौपदी मुर्मू या भारतीय जनता पक्षाचे आमदार व खासदार आणि एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) गटाचे आमदार यांची भेट घेणार आहेत. आज दुपारी 2:30 वाजेच्या दरम्यान द्रौपदी मुर्मू या मुंबईत दाखल होणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) हे विमानतळावर जाणार आहेत. त्यानंतर विमानतळ ( Airport ) परिसरात असलेले पंचतारांकित हॉटेलमध्ये द्रौपदी मुर्मू भारतीय जनता पक्षाचे आमदार व खासदार आणि एकनाथ शिंदे गटाच्या सर्व आमदार त्यांची भेट घेणार आहेत.
द्रौपदी मुर्मू मातोश्रीवर जाणार का? - एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना उद्धव ठाकरे यांनी देखील पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, द्रौपदी मुर्मू यांच्या आजच्या मुंबई दौऱ्यात कोठेही उद्धव ठाकरे यांच्या भेटी संदर्भात आयोजन केलेलं नाही. याआधी राष्ट्रपती पदाचे उमेदवार ज्या वेळेस मुंबईत आले होते. त्यावेळेस त्या उमेदवारांकडून ठाकरे कुटुंबीयांची भेट मातोश्रीवर जाऊन घेण्यात आली होती. त्यामुळे द्रोपती मुर्मू उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेणार का ? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
द्रौपदी मुर्मू आज घेणार YSRCP खासदार आणि आमदारांची भेट - NDA च्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार ( NDA presidential candidate ) द्रौपदी मुर्मू ( Draupadi Murmu ) आज YSRCP खासदार आणि आमदारांची भेट घेणार आहेत. मंगळागिरी येथील एका सभागृहात दुपारी तासभर ही बैठक होणार आहे. बैठकीनंतर मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी ( CM Jagan Mohan Reddy ) यांच्या निवासस्थानी चहापानाचा कार्यक्रम पार पडेल. YSRCP ने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत NTA उमेदवार मुरमुक यांना पाठिंबा जाहीर केल्याची माहिती आहे. त्या दुपारी 2.45 वाजता गन्नावरम विमानतळावर ( Gannavaram Airport ) पोहोचतील आणि तिथून त्या मंगलगिरीच्या फंक्शन हॉलमध्ये दाखल होतील. मुर्मू यांच्यासोबत केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सोमू वीरराजू असतील.
द्रौपदी मुर्मू यांचा बिहार दौरा - काही दिवसांपूर्वी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी बिहारला भेट दिली होती. पाटण्यात आमदार आणि खासदारांची भेट घेऊन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पाठिंबा मागितला होता. तसेच, बिहार आणि झारखंडशी आपले जुने नाते आहे असा खुलासाही त्यांनी यावेळी केला होता. मुर्मू यांनी या दौऱ्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचीही भेट घेतली होती. या भेटीनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुर्मू या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला होता.
राष्ट्रपतीपदाची निवडणूक मुर्मू मोठ्या मताधिक्याने जिंकतील - बिहार दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी द्रौपदी मुर्मू यांच्याशी संवाद साधला. (Nitish Kumar on Draupadi Murmu) यादरम्यान, मुर्मू यांनी त्यांचा पाठिंबा मागितला. सीएम नितीश यांनी केवळ पाठिंबा जाहीर केला नाही तर प्रचंड मतांनी राष्ट्रपती होण्याचा विश्वासही व्यक्त केला. यावेळी जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंह उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, बिहार आणि झारखंड या दोन्ही राज्यांसाठी ही आनंदाची बाब आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक मुर्मू मोठ्या मताधिक्याने जिंकतील याची आम्हाला खात्री आहे.
हेही वाचा - Maharashtra Rain Update : राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळित, शाळांना सुट्टी