ETV Bharat / city

Maharashtra NCRB report 2021 : महिलांवरील एकूण गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र देशात तिसऱ्या स्थानी

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी देशातील महिलांवरील एकूण गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या तीन क्रमांकावर आहे. महिलांचे अपहरण, महिलांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे, महिलांची शालीनता भंग करण्याच्या हेतूने त्यांच्यावर हल्ला करणे आणि महिलांच्या विनयशीलतेचा अपमान यासारख्या प्रकरणांमध्ये महाराष्ट्रातील पहिल्या तीन क्रमांकावर आहेत.

author img

By

Published : Aug 30, 2022, 4:08 PM IST

Updated : Aug 30, 2022, 7:32 PM IST

Etv Bharat
Etv Bharat

मुंबई : राज्यासह देशभरात महिलांवर होणाऱ्या अत्याच्याराच्या घटना चिंताजनक Maharashtra in top three in crimes against women आहेत. त्याचदरम्यान राष्ट्रीय गुन्हे नोंद विभाग (NCRB Report 2021) ने २०१९-२१ या वर्षात महिलांवर झालेल्या अत्याचाराची आकडेवारी जाहीर केली आहे. या अहवालानुसार, महिला अत्याचाराच्या घटनेत संख्या कमी झालेली नाही. आकडेवारीनुसार, २०१९ या वर्षात महिलांवर एकूण ४,०५,३२६ अत्याचाराच्या घटना घडल्या Maharashtra in top three in women crimes आहेत. तर २०२१ मध्ये एकूण ४,२८,२७८ महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत.

एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशात सर्वाधिक महिलांवर अत्याचार होत असल्याचे दिसून येत आहे. २०१९ मध्ये ५९८५३, २०२० मध्ये ४९३८५ आणि २०२१ मध्ये ५६०८३ इतके गुन्हे घडले आहेत. तसेच महिलांवर अत्याचार होणाऱ्या राज्यात दुसरा क्रमांक हा राजस्थान राज्याचा लागतो. राजस्थानात २०१९ मध्ये ४१५५०, २०२० मध्ये ३४५३५ आणि २०२१ रोजी ४०७३८ गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच महाराष्ट्र राज्याचा तिसरा क्रमांक लागत असल्याचे उघड झाले आहे. २०१९ मध्ये ३७१४४, २०२० रोजी ३१९५४ आणि २०२१ मध्ये ३९५२६ इतके महिलांवरील गुन्हे दाखल झाले आहेत. तर पश्चिम बंगाल राज्यात २०१९ मध्ये २९८५९, २०२० मध्ये ३६४३९ आणि २०२१ रोजी ३५८८४ गुन्हे घडल्याने चौथा क्रमांक पश्चिम बंगाल राज्याचा लागतो. त्याचप्रमाणे पाचव्या क्रमांकावर ओडिसाचा लागत असून तेथे २०१९ रोजी २३१८३, २०२० मध्ये ५४८९ आणि २०२१ मध्ये ३१३५२ गुन्हे घडले आहेत. सहाव्या क्रमांकावर मध्य प्रदेशचा लागत असून तेथे २०१९ मध्ये २७५६०, २०२० मध्ये २५६४० आणि २०२१ मध्ये ३०६७३ गुन्हे घडले आहेत.

आसाम राज्याचा सातवा क्रमांक लागत असून आसामात २०१९ मध्ये ३००२५, २०२० रोजी २६३५२ आणि २०२१ मध्ये २९०४६ इतके महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे नोंद आहेत. तर तेलंगणा राज्यात महिलांवरील गुन्हे इतके घडले की त्या राज्याचा आठवा क्रमांक लागतो. तेलंगणामध्ये २०१९ मध्ये १८३९४, २०२० मध्ये १७७९१ आणि २०२१ मध्ये २०८६५ गुन्हे घडले आहेत. त्याचप्रमाणे बिहार राज्याचा नववा क्रमांक लागत असून २०१९ साली बिहारमध्ये १८५८७, २०२० मध्ये १५३५९ आणि २०२१ मध्ये १७९५० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हरियाणा राज्याचा दहावा क्रमांक लागत असून तेथे २०१९ मध्ये १४६८३, २०२० मध्ये १३ हजार आणि २०२१ मध्ये १६६५८ इतके महिलांविरोधात घडलेले गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या सर्व आकडेवारीवरून महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Last Updated : Aug 30, 2022, 7:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.