ETV Bharat / city

Jayant Patil On Pawar-Modi Meet : शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'या' कारणासाठी घेतली भेट; जयंत पाटलांनी दिली माहिती

author img

By

Published : Apr 6, 2022, 4:51 PM IST

वर्ष उलटून गेले तरी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यपाल नामनिर्देशित बारा आमदारांच्या यादीवर सही केलेली नाही. देशातील सर्वोच्च पद हे पंतप्रधानांचे आहे. त्यामुळे हे प्रकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर घालण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधानांची भेट घेतली, असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी ( Jayant Patil On Sharad Pawar PM Narendra Modi Meet ) बोलताना दिली.

Jayant Patil On Pawar-Modi Meet
जयंत पाटलांनी दिली माहिती

मुंबई - वर्ष उलटून गेले तरी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यपाल नामनिर्देशित बारा आमदारांच्या यादीवर सही केलेली नाही. देशातील सर्वोच्च पद हे पंतप्रधानांचे आहे. त्यामुळे हे प्रकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर घालण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधानांची भेट घेतली, असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत ( Jayant Patil On Sharad Pawar PM Narendra Modi Meet ) प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

शरद पवार यांना केली होती विनंती - गेल्या वर्ष भरापासून महाविकास आघाडी सरकारकडून 12 आमदारांच्या नावांची यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना देण्यात आली. मात्र अद्यापही या बाबत राज्यपालांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. बारा आमदारांची नियुक्‍ती बाबतचे प्रकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानी घालावे, यासाठी शरद पवार यांना गेल्या आठवड्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विनंती केली होती. ही विनंती केल्यानंतरच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मात्र महाराष्ट्रात सध्या केंद्रीय तपास यंत्रणेकडून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर आणि मंत्रालय सुरू असणाऱ्या कारवाईबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट.. चर्चांना उधाण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.