ETV Bharat / city

अनिल देशमुख कुठे लपून बसले याची माहिती राष्ट्रवादीने द्यावी - भाजप प्रवक्ते उपाध्ये

अनिल देशमुख कुठे लपून बसले याची माहिती राष्ट्रवादीने द्यावी, अशी मागणी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.

author img

By

Published : Sep 6, 2021, 7:39 PM IST

Updated : Sep 6, 2021, 9:58 PM IST

BJP Spokesperson
भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये

मुंबई - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाकडून ( ईडी) लुकआऊट नोटीस बजावली आहे. याला उत्तर देण्यासाठी अनिल देशमुख टाळाटाळ करत आहेत. अनिल देशमुख कुठे लपून बसले याची माहिती राष्ट्रवादीने द्यावी, अशी मागणी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. माजी गृहमंत्री राहिलेले अनिल देशमुख सापडत नसतील तर ही राज्याची शोकांतिका असल्याची टीका केशव उपाध्ये यांनी केली.

भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये

हेही वाचा - ..तर महाराष्ट्राला फार मोठी किंमत चुकवावी लागेल, उत्सव नंतरही साजरे करू, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

  • सांगा अनिल देशमुख आहेत कुठे?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना शंभर कोटी रुपये खंडणी घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालयाकडून आतापर्यंत पाच वेळा चौकशीचे समन्स बजावले. मात्र, देशमुख गैरहजर राहिल्यानंतर आता ईडीकडून देशमुखांना लुकआऊट नोटीस बजावली आहे. तरीसुद्धा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा पत्ता लागत नाही, हे महाराष्ट्र राज्यासाठी अशोभनीय आहे. अनिल देशमुख कुठे फरार झाले आहेत? याची माहिती महाविकास आघाडी सरकार आणि सरकारमधील असलेल्या राष्ट्रवादीने द्यावी, अशी मागणी भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.

  • देशमुखांनी चौकशीला सामोरे जावे -

गेल्या काही महिन्यापूर्वी माजी गृहमंत्री म्हणत होते की आम्ही कायद्याला मानतोय आम्ही ईडीच्या चौकशीला सहकार्य करु, मात्र आतापर्यत चौकशीचे समन्स बजाऊन देशमुख उपस्थितीत राहिले नाहीत. अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचारासारखे गंभीर आरोप आहेत. अगोदर चौकशीसाठी टाळाटाळ करणे आणि खोटे अहवाल तयार करून लाचखोरीचे प्रयत्न करणे अशी भूमिका लोकप्रतिनिधी म्हणून अशोभनीय आहे. त्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीला समोर जावे आणि आपले मत मांडावे, असा सल्लासुद्धा भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी अनिल देशमुखांना दिला आहे.

  • मंदिरात कोरोना होतोय का?

राज्यात मंदिरे व्यतिरिक्त सर्व सुरू आहे. मात्र, मंदिर सुरू झाले तर कोरोना होतो अशी धारणा सरकारची आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या तोंडावर कोरोनाचे कारण देऊन मंदिरे आणि धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध आणले जातात, असे मत भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मांडले. तसेच शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे राजकीय मेळावे होतात. या मेळाव्यात मोठ्या प्रमाणे गर्दी होते. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी आपल्या सहकारी पक्षाला समजून सांगणे गरजेचे आहे, असा सल्लासुद्धा उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

हेही वाचा - कोविडमुळे निवडणुका घेता आल्या नाही, प्रशासकांची नेमणूक जाणीवपूर्वक नाही - नवाब मलिक

Last Updated : Sep 6, 2021, 9:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.