ETV Bharat / city

Two day convention : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिल्लीत दोन दिवशीय राष्ट्रिय अधिवेशन

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिल्लीत दोन दिवसीय राष्ट्रिय अधिवेशन (two day convention) असून, दिल्लीच्या तलाकटोरा या स्टेडियमवर ( Talaqatora Stadium) हे अधिवेशन पार पडणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी महत्त्वाची रणनीती (Important Strategy for Lok Sabha Elections) यासोबतच सर्व विरोधकांना एकत्र आणण्याबाबत महत्त्वाच्या नेत्यांच्या गाठीभेटीबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. देशपातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी ही महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Sharad Pawar
शरद पवार
author img

By

Published : Sep 10, 2022, 1:45 PM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (Nationalist Congress Party) राष्ट्रीय अधिवेशन आज दिल्लीत होणार आहे. हे दोन दिवसीय अधिवेशन (two day convention) असून, दिल्लीच्या तलाकटोरा या स्टेडियमवर ( Talaqatora Stadium) हे अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्यासह राष्ट्रीय पातळीवरचे आणि राज्यातील सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. या बैठकीला ओडीसा, झारखंड, छत्तीसगड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र यांच्यासह इतर राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटन मजबूत आहे या सर्व राज्याची कार्यकारणी या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहे.

हे ठराव विरोधी ऐक्यासाठी ब्लू प्रिंट असू शकतात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, पक्षाने ध्वजांकित केलेले मुद्दे सामान्य माणसाला भेडसावणार्‍या समस्यांना आवाज देण्यासाठी आणि मोदी सरकारने प्रचारित केलेल्या वक्तृत्वाला कमी करण्याचा प्रयत्न करतात.शौचालय बांधणे, सर्वांना घरे, सर्वांना पिण्याचे पाणी आणि प्रत्येक गावात ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी यांसारख्या 2022 पर्यंत मोदींनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणारी एक पुस्तिकाही पवारांनी जाहीर करणे अपेक्षित आहे.2024 च्या निवडणुकीसाठी नेते एकत्रित अजेंडावर काम करत असल्याने विरोधी एकतेचे भव्य प्रदर्शन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पाटणा, कोलकाता आणि मुंबई येथे रॅली घेण्याचा प्रस्ताव ठेवण्याची शक्यता आहे.

काय होणार बैठकीत चर्चा : 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठक अत्यंत महत्त्वाचे असून, लोकसभेच्या निवडणुकीसाठी महत्त्वाची रणनीती यासोबतच सर्व विरोधकांना एकत्र आणण्याबाबत महत्त्वाच्या नेत्यांच्या गाठीभेटीबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच देशभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी तसेच, जनतेसोबत संपर्क करण्याबाबतचे नियोजन देशभरात कार्यकर्त्यांचे संपर्क मेळावे भरण्याबाबत देखील निश्चिती या बैठकीतून केली जाणार आहे. देशपातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी ही महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. 11 सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देशभरातील सर्व महत्त्वाच्या नेत्यांना आणि राज्यातील कार्यकारणी सदस्यांना संबोधित करणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.