ETV Bharat / city

'करमाड रेल्वे अपघाताने मनाला यातना; स्थलांतरीत मजुरांसाठी तातडीने भरारी पथकांची नेमणूक करा'

औरंगाबादजवळील करमाड रेल्वे दुर्घटनेत मजुरांच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी अतिशय व्यथित करणारी आहे. कोरोना महामारीच्या काळातील या अपघाताने केवळ मनाला यातनाच झाल्या नाही तर पायी चालत आपल्या मूळ गावी स्थलांतर करू इच्छिणाऱ्या लोकांचे बिकट प्रश्न ऐरणीवर आले आहेत, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

sharad pawar
शरद पवार
author img

By

Published : May 8, 2020, 1:08 PM IST

मुंबई - औरंगाबादजवळील करमाड येथे सटाणा शिवारात मालवाहू रेल्वेखाली येऊन परराज्यातील १६ मजुरांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले असून यात त्यांनी सरकारला काही सुचना देखील केल्या आहेत. 'करमाड येथील रेल्वे अपघातानंतर स्थलांतरित मजुरांचा प्रश्न ऐरणीवर आला असून याबाबत सरकारने गांभीर्याने भूमिका घ्यावी आणि भरारी पथकाची नेमणूक करावी' अशा सुचना शरद पवारांनी केली आहे.

  • राज्य सरकारांनीही या स्थलांतरित मजुरांसाठी भरारी पथकांची नियुक्ती करून सातत्याने त्यांचा पाठपुरावा करून त्यांच्या गरजांबाबत काळजी घ्यावी. केंद्र व राज्य सरकारांनी एकत्रित येऊन तातडीने दखल घेऊन या प्रश्नांची सोडवणूक करावी.

    — Sharad Pawar (@PawarSpeaks) May 8, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ट्विटमध्ये काय म्हणाले शरद पवार ?

'औरंगाबादजवळील करमाड रेल्वे दुर्घटनेत मजुरांच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी अतिशय व्यथित करणारी आहे. कोरोना महामारीच्या काळातील या अपघाताने केवळ मनाला यातनाच झाल्या नाही तर पायी चालत आपल्या मूळ गावी स्थलांतर करू इच्छिणाऱ्या लोकांचे बिकट प्रश्न ऐरणीवर आले आहेत. असंघटित क्षेत्रातील मजूर सद्यस्थितीत बेरोजगारीच्या भीतीने शहर सोडून जात असेल तर सर्वप्रथम त्याच्या रोजगाराच्या ठिकाणच्या कॉन्ट्र‌ॅक्टर अथवा मालकाने त्यांची काळजी घ्यावी. ते शक्य होत नसल्यास सरकारला कळवावे. राज्य सरकारांनीही या स्थलांतरित मजुरांसाठी भरारी पथकांची नियुक्ती करून सातत्याने त्यांचा पाठपुरावा करून त्यांच्या गरजांबाबत काळजी घ्यावी. केंद्र व राज्य सरकारांनी एकत्रित येऊन तातडीने दखल घेऊन या प्रश्नांची सोडवणूक करावी' असे शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

वाचा... लॉकडाऊनची संहारकता.. औरंगाबादजवळ १६ परप्रांतीय मजुरांना मालगाडीने चिरडले, एक गंभीर

काय घडले औरंगाबादमध्ये ?

शुक्रवारी भल्या पहाटेच एक मोठी भीषण दुर्घटना औरंगाबादमध्ये झाल्याचे समोर आले. बदनापूर ते करमाडदरम्यान मालगाडीखाली चिरडून १६ परप्रांतीय कामगारांचा मृत्यू झाला आहे. जालन्याच्या एका स्टील कंपनीत काम करणारे हे १९ मजूर गावी जाणारी रेल्वे पकडण्यासाठी भुसावळला पायीच निघाले होते. दरम्यान प्रवासात ते औरंगाबदपर्यंत आले. रात्र झाल्याने सर्वजण रेल्वे रुळावर झोपले होते. या सर्वांना झोपेतच मालगाडीने चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.