ETV Bharat / city

'गरिबांविषयी कनव कालही होती अन् आजही आहे.. मंत्रीपदामुळे त्यांच्यासाठीच अधिक काम करेन' - maharashtra government Cabinet expansion

सरकारमध्ये तीन वेगवेगळ्या पक्षाचे लोक असले, तरी ते आमचे शत्रु नाहीत. आमचा सर्वांचा खरा शत्रु फॅसिझम आहे. त्याविरोधात आम्ही एकत्र आलो आहोत, असे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.

Jitendra Awhad
जितेंद्र आव्हाड
author img

By

Published : Dec 30, 2019, 7:11 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज सोमवारी मुंबईत विधिमंडळ परिसरात पार पडला. यावेळी राष्ट्रावदी काँग्रेसकडून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी आपल्या भावना ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीजवळ व्यक्त केल्या आहेत. गरिबांविषयी कनव कालही होती आणि आजही आहे. उलट मंत्रीपदामुळे त्यांच्यासाठीच अधिक काम करता येईल, असे आव्हाड यांनी म्हटले.

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रतिक्रिया...

गरिबांना रोजीरोटी मिळावी यासाठीच काम करायचंय... आव्हाड

मंत्रीपद मिळणे, ही फार मोठी गोष्ट नाही. त्यामुळे विशेष काही बदल होत नाही. खर तर गरिबांविषयी कणव कालही होती, आजही आहे आणि उद्याही असेल. त्यामुळे मंत्री झाल्यावर त्याच्यासाठी अधिक काम करता येईळ, असे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.

हेही वाचा... येडीयुरप्पांच्या 'त्या' विधानाला ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटलांनी दिले उत्तर, म्हणाले...

आमच्या सगळ्यांचा शत्रु एकच 'फॅसिझम' - आव्हाड

सरकारमध्ये तीन वेगवेगळ्या पक्षाचे लोक असले, तरी ते आमचे शत्रु नाहीत. आमचा सर्वांचा खरा शत्रु फॅसिझम आहे. त्याविरोधात आम्ही एकत्र आलो आहोत, असे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीचे फायरब्रँड नेते... जितेंद्र आव्हाड

शरद पवारांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून जितेंद्र आव्हाड यांची ओळख आहे. पुरोगामी विचारसरणीचे पुरस्कर्ते जितेंद्र आव्हाड अनेकदा आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यांनी चर्चेत राहिलेत. महाराष्ट्रातील दहीहंडी जगभरात पोहोचवण्यात जितेंद्र आव्हाड यांचा मोठा वाट आहे. राष्ट्रवादी पक्षातील ओबीसी चेहरा अशीही त्यांची ओळख आहे. कळवा-मुंब्रा मतदार संघातून ते निवडून आले आहेत. 2002 मध्ये जितेंद्र आव्हाड यांनी सर्वात प्रथम आमदारकीची निवडणूक लढवली होती. त्यानंतर ते सलग कळवा-मुंब्रा मतदारसंघातून निवडून आले आहेत.

हेही वाचा... उद्धव ठाकरेंनी प्रस्थापितांना डावलत नवख्यांना दिली मंत्रिमंडळात संधी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.