ETV Bharat / city

शरद पवारांनी घेतली संजय राऊतांची भेट; अँजिओप्लास्टिच्या पार्श्वभूमीवर केली तब्येतीची विचारपूस.. - Ajit pawar met Sanjay Raut

संजय राऊत यांच्यावर लीलावती रुग्णालयात नुकतीच अँजिओप्लास्टी नावाची एक छोटी सर्जरी झाली. कालच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून, आज राष्ट्रवादीच्या नेत्यांनी थेट राऊतांच्या घरी जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारणा केली. यावेळी राऊत यांच्या आईंचीसुद्धा भेट घेत अनेक कौटुंबिक गप्पाही या नेत्यांनी केल्या, असे सांगण्यात येत आहे.

Sanjay Raut met Sharad Pawar
शरद पवारांनी घेतली संजय राऊतांची भेट; अँजिओप्लास्टिच्या पार्श्वभूमीवर केली तब्येतीची विचारपूस..
author img

By

Published : Dec 6, 2020, 12:05 PM IST

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर नुकतीच अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया पार पडली. या पार्श्वभूमीवर त्यांची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राऊतांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडेही उपस्थित होते. तसेच, राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊतही यावेळी उपस्थित होते.

संजय राऊत यांच्यावर लीलावती रुग्णालयात नुकतीच अँजिओप्लास्टी नावाची एक छोटी सर्जरी झाली. कालच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून, आज राष्ट्रवादीच्या नेत्यांनी थेट राऊतांच्या घरी जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारणा केली. यावेळी राऊत यांच्या आईंचीसुद्धा भेट घेत अनेक कौटुंबिक गप्पाही या नेत्यांनी केल्या, असे सांगण्यात येत आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकारला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे मात्र या वर्षभरात राऊत यांच्या घरी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अशा प्रकारची एकत्र भेट कधीही दिली नव्हती त्यामुळे तब्येतीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, यांची ही भेट पहिली ठरली आहे.

हेही वाचा : महापरिनिर्वाण दिन : राज्यपालांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.