ETV Bharat / city

ती तर बारमध्ये काम करणारी, विद्या चव्हाण यांची नवनीत राणांवर जहरी टीका

दिल्लीतील मंदिरात महाआरती करणाऱ्या खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) आणि आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांच्यावर राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण ( NCP leader Vidya Chavan ) यांनी जहरी टीका केली आहे. ती तर बारमध्ये काम करत होती अशा शब्दात चव्हाण यांनी रानांवर आसूड ओढले आहेत.

विद्या चव्हाण
विद्या चव्हाण
author img

By

Published : May 14, 2022, 3:55 PM IST

मुंबई - खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) आणि आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांनी आज दिल्लीतील एका प्राचीन हनुमान मंदिर आहे. हनुमान चालीसा पठण केले. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण ( NCP leader Vidya Chavan ) चांगल्याच संतापल्या. कोण आहेत या नवनीत राणा त्यांना एवढे का महत्त्व द्यायचे..? कुणीही उठ सूट मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचा अपमान करतात. हे अतिशय संतापजनक आणि चीड आणणारे आहे. हनुमान चालीसा म्हणून हिंदुत्व दाखवणाऱ्या या नवनीत राणा आधी बारमध्ये काम करत होत्या. हे सर्वांना माहीत आहे, अशा शब्दात त्यांनी टीकास्त्र सोडले. जातीचे खोटे प्रमाणपत्र घेऊन खासदार झालेल्या महिलेला किती महत्त्व द्यायचे, असा खोचक सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

विना झाकणाचे कुकर वाटणारा आमदार - विधानसभा निवडणुकीत रवी राणा यांनी महिलांना बोलावून कुकर वाटप केले होते. मात्र, या कुकरला झाकण नसल्याचे महिलांच्या लक्षात आले महिलांनी याबाबत राणा यांच्याकडे विचारणा केली असता आधी मतदान करा मग झाकण देतो, असे राणा यांनी सांगितले होते, असा आरोपही चव्हाण यांनी आमदार राणा यांच्यावर केला आहे. त्यामुळे राणा यांची मानसिकता आणि वृत्ती काय आहे ते उघड होते, असा टोलाही चव्हाण यांनी लगावला.

हेही वाचा - Ketaki Chitale : अभिनेत्री केतकी चितळेच्या अटकेची शक्यता.. शरद पवारांवरील 'पोस्ट'वरून गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.