ETV Bharat / city

'समितीच्या शिफारशीनंतरच बदल्या होतात हे फडणवीसांना माहीत नाही?'

राज्य सरकार हे खंबीर असून सरकारला अस्थिर करण्याचा कट सध्या विरोधक करत आहेत, असा टोला मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.

ncp leader nawab malik
ncp leader nawab malik
author img

By

Published : Mar 24, 2021, 3:11 PM IST

Updated : Mar 24, 2021, 3:16 PM IST

मुंबई - बदलीच्या प्रकरणावरून विरोधीपक्षाने राज्य सरकारवर टीका केली, यावर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी त्यांना प्रत्त्युत्तर दिले आहे. मात्र राज्य सरकार हे खंबीर असून सरकारला अस्थिर करण्याचा कट सध्या विरोधक करत आहेत, असा टोला मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.

हेही वाचा - परमबीर सिंग यांचा गृहमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न - नवाब मलिक

'देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेला अहवाल अवैध'

जो अहवालाला घेऊन फडणवीस आणि भाजपाचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले, तो अहवालाच अवैध असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. त्या अहवालाला घेऊन राज्य सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न फडणवीस करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर हे सरकार तीन महिन्यात पडेल किंवा सहा महिन्यात पडेल, अशा प्रकारच्या वल्गना भाजपाने केल्या होत्या. मात्र तसे काहीही झाले नाही, उलट हे सरकार खंबीरपणे अजूनही उभे आहे. त्यामुळेच राज्य सरकारला अस्थिर करण्याचा हा सर्व प्रयत्न आहे. मात्र फडणवीस हे स्वतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री राहिलेले आहेत.

हेही वाचा - 'एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानेच जळगावात भाजपा कमकुवत'

'शिफारशीनंतरच बदल्या'

पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यासाठी एक वेगळी समिती असते. ती समिती एसीएस होम यांच्या अध्यक्षतेखाली असून त्या समितीच्या शिफारशीनंतरच अशा प्रकारच्या बदल्या केल्या जातात, हे फडणवीस यांना माहिती नाही का, असा उलट प्रश्न त्यांनी केला आहे.

Last Updated : Mar 24, 2021, 3:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.