मुंबई - उदयनराजे दिवस-रात्र काय करतात, याची माहिती साताऱ्यातील मतदारांना आहे, त्यामुळे ते त्यांना जागा दाखवतील, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले.
हेही वाचा - उदयनराजेंना राष्ट्रवादीत त्रास होत असल्याचे 15 वर्षानंतर आत्ता कळले - सुप्रिया सुळे
उदयनराजे यांनी आज (शनिवारी) भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, उदयनराजे यांनी कायम पक्षाला कमकुवत करण्याचे काम केले. आम्ही ही पोटनिवडणूक पूर्ण ताकदीने लढू आणि १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने जसा त्यांचा पराभव केला तसा पराभव यावेळी करू, असे वक्तव्य ही त्यांनी यावेळी केले.
हेही वाचा - 'बालिश चाळ्यांना पाठीशी घातलं, पोटच्या पोरावाणी प्रेम केलं, सांगा साहेब काय मिळालं'
काय घडलं होत १९९९ साली -
उदयनराजे हे पूर्वी भाजपमध्ये होते, ते राज्यमंत्री असताना 1999 मध्ये राष्ट्रवादीने त्यांचा पराभव केला होता. मात्र, नंतरच्या काळात त्यांच्या मातोश्रींनी पवारांना विनंती करुन तिकीट द्यायला लावले आणि ते खासदार झाले, अशी माहिती मलिक यांनी दिली.