ETV Bharat / city

Cruise Drug Case : अरबाज मर्चंटला ताब्यात घेणारा भाजपचा नेता; नवाब मलिकांचा गौप्यस्फोट - कार्डिया क्रुझ ड्रग् कारवाई

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंटला पकडणारे अधिकारी हे एनसीबीचे नसून, ते भाजपचे पदाधिकारी असल्याचा गौप्यस्फोट नवाब मलिक यांनी केला आहे. या आरोपांमुळे आता एनसीबीच्या कारवाईवर संशय निर्माण झाला आहे.

नवाब मलिक
नवाब मलिक
author img

By

Published : Oct 6, 2021, 4:33 PM IST

Updated : Oct 6, 2021, 7:48 PM IST

मुंबई - 'कार्डिया क्रुझ'वरील ड्रग्स पार्टीची कारवाई बोगस आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंटला पकडणारे अधिकारी हे एनसीबीचे नसून, ते भाजपचे पदाधिकारी असल्याचा गौप्यस्फोट नवाब मलिक यांनी केला आहे. अरबाज मर्चंटला भाजपचा उपाध्यक्ष मनीष भानुशाली यांनी ताब्यात घेतल्याचा खळबळजनक आरोप मलिक यांनी केला आहे. भाजप आणि एनसीबीचे काय कनेक्शन आहे, हे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट करावे, असेही मलिक यांनी स्पष्ट केले. या आरोपांमुळे आता एनसीबीच्या कारवाईवर संशय निर्माण झाला आहे.

माहिती देताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक

'कार्डिया क्रुझ'वरील ड्रग्स पार्टीवर एनसीबीने रविवारी पहाटेच्या सुमारास मोठी कारवाई केली. या प्रकरणामध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासहीत आठ जणांना एनसीबीने ताब्यात घेतले. त्यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्या क्रुझवर जाऊन तपासणी करत कोकीन, चरस, एमडी आणि एक्स्टसीच्या गोळ्या जप्त केल्या होत्या.

  • भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ही कारवाई केल्याचा मलिकांचा आरोप -
    nawab malik on manish bhanushali
    नवाब मलिक यांनी प्रसिद्ध केलेले फोटो

एनसीबीने मुंबईसह नवी मुंबईतून ड्रग्स पुरवठा करणाऱ्या डायलरला ताब्यात घेतले. आतापर्यंत 16 जणांना अटक केली आहे. एनसीबीकडून या प्रकरणाची कारवाई सुरू असतानाच आता या प्रकरणात ट्विस्ट आले आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीच्या कार्डिया क्रुझवरील कारवाईतील व्हिडिओ आणि फोटोद्वारे पर्दापार्श केला. तसेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ही कारवाई केल्याचा गंभीर आरोप करत, एनसीबीच्या कारवाईची पत्रकार परिषद घेत हवा काढून टाकली.

nawab malik on manish bhanushali
नवाब मलिक यांनी प्रसिद्ध केलेले फोटो

हेही वाचा - Cruise Drug Case : आता एनसीबीच्या मदतीला अन्य राज्यातील अधिकारी

  • भाजपवर नवाब मलिक यांचे गंभीर आरोप -

3 ऑक्टोबरच्या कारवाईनंतर एनसीबीने स्वतःहून क्राईम रिपोर्टर्सना या कारवाईचे व्हिडिओ दिले होते. त्या व्हिडिओमध्ये दोन खासगी लोकं अटक करताना स्पष्ट दिसत आहेत. के.पी. गोसावी या व्यक्तीने आर्यन खानला अटक झाल्यानंतर त्याच्यासोबत एक सेल्फी काढला होता. हा सेल्फी बराच व्हायरल झाला. त्यानंतर एनसीबीने ट्विट करुन के. पी. गोसावी अधिकारी नसल्याचे सांगितले. के.पी. गोसावीवर पुण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्याच्या फेसबुकवर तो खासगी हेर असल्याचे स्टेटस ठेवतो. के.पी.गोसावीचा एनसीबीशी काय संबंध आहे? हे आता समोर आले पाहिजे, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली. तसेच अरबाज मर्चंटला अटक करणारा मनिष भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष असल्याचे त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन दिसून आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत त्याचे फोटो आहेत. हा व्यक्ती कोण? हे एनसीबीने स्पष्ट करावे, अशी मागणीही मलिक यांनी केली आहे.

nawab malik on manish bhanushali
नवाब मलिक यांनी प्रसिद्ध केलेले फोटो

सध्या के.पी.गोसावी आणि भानुशाली यांची फेसबुक प्रोफाईल लॉक आहे. पण भानुशालीची हालचाल आम्ही शोधून काढली असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले. भानुशाली हा २१ आणि २२ सप्टेंबर रोजी गुजरातमधील काही मंत्र्यांना भेटला होता. २१ सप्टेंबर रोजीच अदानी पोर्टवर अफगाणिस्तान येथून आलेले हजारो कोटींचे ड्रग्ज सापडले होते. त्यानंतर २८ तारखेला पुन्हा एकदा भानुशाली गुजरातमधील मंत्रालयात जाऊन राणा नावाच्या मंत्र्याला भेटला होता. त्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी मुंबईत कारवाई झाल्यानंतर त्याच कारवाईत भानुशाली कसा काय सामील होता? मनिष भानुशालीचे गुजरातमधील अदानी बंदरावर सापडलेल्या ड्रग्जचा काय संबंध आहे? तसेच भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष कसा? याची उत्तरे एनसीबी आणि भाजपने दिली पाहिजेत, असेही नवाब मलिक यांनी सांगितले. तसेच क्रूझवर जे अमली पदार्थ सापडल्याचे सांगितले जात आहेत, त्याचे फोटो देखील एनसीबीच्या मुंबईतील प्रांतिक कार्यालयात काढले गेले आहेत. एनडीपीएस कायद्यानुसार अंमली पदार्थ जप्त केल्याच्या ठिकाणीच त्याचा पंचनामा झाला पाहिजे. मग क्रूझवर अंमली पदार्थ सापडल्यानंतर त्याच ठिकाणी त्याचे फोटो किंवा व्हिडिओ का नाही काढले गेले? असाही प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित केला.

nawab malik on manish bhanushali
नवाब मलिक यांनी प्रसिद्ध केलेले फोटो
  • ३६ वर्ष एनसीबीने चांगले काम केले होते - नवाब मलिक

राजीव गांधी देशाचे पंतप्रधान असताना २३ ऑगस्ट १९८५ रोजी एनडीपीएस कायदा पारित करण्यात आला. हा कायदा लागू करताना राजीव गांधी यांची अपेक्षा होती की, देशाला अंमलीपदार्थाच्या जाळ्यातून बाहेर काढणे. अंमली पदार्थाचे उत्पादन, खरेदी-विक्री, ट्रान्सपोर्ट करणारे सर्व लोक या कायद्याखाली आरोपी म्हणून निश्चित झाले. या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार केंद्रासहीत राज्यांनाही देण्यात आले. तसेच एनसीबी ही केंद्रीय यंत्रणाही गठीत करण्यात आली. ही यंत्रणा एकापेक्षा जास्त राज्यात गुन्हे असतील किंवा परदेशात गुन्ह्याचे कनेक्शन असेल तर त्याचा छडा लावणे सोपे जावे, त्यासाठी केंद्रीय यंत्रणा बनविण्यात आली होती. मागच्या ३६ वर्षात या केंद्रीय यंत्रणेने चांगले काम केले. अनेक मोठे रॅकेट या यंत्रणेने उध्वस्त केले. मात्र आता एनसीबी ही भाजपच्या इशाऱ्यावर काम करत आहे का? असा आरोप नवाब मलिक यांनी केला. तसेच एनसीबीच्या अधिकाऱ्यांना झटपट प्रसिद्धी मिळवण्याची हौस लागली असल्याचेही नवाब मलिक म्हणाले.

photo
नवाब मलिक यांनी प्रसिद्ध केलेले फोटो

हेही वाचा - मुंद्रा पोर्ट ड्रग प्रकरणात अदानींना मोदी सरकार कधी अटक करणार?; काँग्रेसचा सवाल

Last Updated : Oct 6, 2021, 7:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.