मुंबई - शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी दिलेली मुदत संपल्यानंतर राज्यातील तिसऱ्या क्रमांकावरील पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत राज्यपालांनी सत्ता स्थापनेच्या चर्चेसाठी बैठकीचे आयोजन केले. बैठकीत झालेल्या घटनांचा तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे. यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना,'आम्ही मित्र पक्षांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेऊ',अशी माहिती दिली. तसेच आम्हाला उद्या सायंकाळी ८:३० वाजेपर्यंत सत्तास्थापनेसाठी बहुमत सिद्ध करण्याचा अवधी राज्यपालांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.
-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने मा. राज्यपाल महोदयांची भेट घेतली. मा. राज्यपाल महोदयांनी आम्हाला सत्ता स्थापनेचे आमंत्रण दिले आहे. आमचा सहकारी पक्ष काँग्रेस पक्षाशी चर्चा करून आम्ही आमचा निर्णय मा. राज्यपालांना लवकरच कळवू. pic.twitter.com/0xaRJpb61M
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) November 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने मा. राज्यपाल महोदयांची भेट घेतली. मा. राज्यपाल महोदयांनी आम्हाला सत्ता स्थापनेचे आमंत्रण दिले आहे. आमचा सहकारी पक्ष काँग्रेस पक्षाशी चर्चा करून आम्ही आमचा निर्णय मा. राज्यपालांना लवकरच कळवू. pic.twitter.com/0xaRJpb61M
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) November 11, 2019राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने मा. राज्यपाल महोदयांची भेट घेतली. मा. राज्यपाल महोदयांनी आम्हाला सत्ता स्थापनेचे आमंत्रण दिले आहे. आमचा सहकारी पक्ष काँग्रेस पक्षाशी चर्चा करून आम्ही आमचा निर्णय मा. राज्यपालांना लवकरच कळवू. pic.twitter.com/0xaRJpb61M
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) November 11, 2019
अद्याप सत्ता स्थापनेचा तिढा सुटला नसून, उद्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे. तसेच आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेसची सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक पार पडणार असून, यानंतर आघाडीतील सल्लामसलतीची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. यानंतर काँग्रेसचे बडे नेते राज्यात दाखल होणार असून, पुढील घटनाक्रम स्पष्ट होणार आहे.