ETV Bharat / city

मुंडे-मलिकांच्या राजीनाम्या बाबत जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य, म्हणाले... - जयंत पाटील धनंजय मुंडे प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री असलेल्या धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ही मागणी स्पष्ट शब्दात फेटाळून लावली आहे. सध्या दोन्ही विषयात राजीनाम्याची आवश्यकता नाही.

Jayant patil on Dhananjay munde matter
मुंडे- मलिकांच्या राजीनाम्या बाबत जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
author img

By

Published : Jan 14, 2021, 1:44 PM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री असलेल्या धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ही मागणी स्पष्ट शब्दात फेटाळून लावली आहे. सध्या दोन्ही विषयात राजीनाम्याची आवश्यकता नाही. तशी परिस्थिती नाही. त्या परिस्थितीचा योग्य तो आढावा योग्य त्या स्तरावर घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. शिवाय मंत्रीमंडळात फेरबदल होण्याची शक्यताही त्यांनी फेटाळली आहे.

जयंत पाटलांटचे नो कमेंट..

धनंजय मुंडे यांच्यावर झालेला बलात्काराचा आरोप आणि नवाब मलिक यांच्या जावयावर एनसीबीने केलेली कारवाई दोन्ही विषयावर काही बोलण्यास पाटील यांनी नकार दिला. दोन्ही विषय पोलिसांकडे आहेत. त्यामुळे आम्हाला पोलिसांवर दबाव आणायचा नाही असेही ते म्हणाले. मात्र निरपेक्षपणे चौकशी व्हावी असे आपले मत असल्याचे जयंत पाटील यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. प्रदेश कार्यालयात पाटील आले असता माध्यमांनी मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्या विषयावर त्यांच्याशी संवाद साधला.

जावयाची शिक्षा सासऱ्याला का?

मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी अटक केली आहे. मात्र त्यांच्या जावयाचा त्यात सहभाग आहे की नाही हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे त्याचा परिणाम सासऱ्यावर होणार नाही असेही ते म्हणाले.

मुंडें विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार..

एका महिलेने त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहे. तीच्या म्हणण्या नुसार 'धनंजय मुंडे यांनी मला सांगितले की तुम्हाला गायक बनायचे असेल तर मी चित्रपट जगतातील बड्या चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्यांसमवेत तुझी भेट करुन देतो आणि बॉलीवूडमध्ये लॉन्च करेन. याचा लोभ धरुन त्यांनी माझ्या इच्छेविरूद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मुंडे यांनी सतत लैंगिक अत्याचार केले. जेव्हा-जेव्हा माझी बहीण कामानिमित्त बाहेर पडली, तेव्हा ते मला शारीरिक संबंध बनवण्यास भाग पाडत असत. बलात्काराचा आरोप झाल्यानंतर भाजपाने धनंजय मुंडे यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. त्यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र, धनंजय मुंडे यांनी या आरोपांचे खंडन केले आहे.

काय आहे नवाब मलिकांच्या जावयाचे प्रकरण..

समिर खान हा नवाब मलिक यांचा जावई आहे. त्याच्यात आणि करण सजनानी यांच्यामध्ये झालेल्या व्हाट्सअप चॅट मध्ये अमली पदार्थांच्या तस्करी बाबत चर्चा करण्यात आलेली होती. याबरोबरच समीर खान याच्या बँक अकाउंटमधून करण सजनानी या ब्रिटिश अनिवासी भारतीयाच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात आले होते. मात्र ट्रान्सफर करण्यात आलेले पैसे किती होते, याचा खुलासा एनसीबीने केलेला नाही. समीर खानला अटक केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी यावर बोलताना म्हटले आहे, की कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. कायद्याने त्याचे काम करावे व सत्य लवकरच समोर येईल, असे म्हणत नवाब मलिक यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.