मुंबई वेदांत ग्रुप व फोक्सकॉन कंपनीच्या संयुक्त भागीदारीत असलेला प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला हलवण्यात आले ( Vedanta Group company project migration issue ) आहे. यावरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( NCP leader Jayant Patil criticized state government ) यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
वेदांत ग्रुप व फोक्सकॉन कंपनीच्या संयुक्त भागीदारीत सुमारे २० बिलियन डॉलर्स म्हणजेच एक लाख अठ्ठावन्न हजार कोटी इतकी भांडवली गुंतवणूक असलेला प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटून गुजरातला गेलेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना राजकीय सभा घेण्यातून वेळ मिळत नसल्याने पुन्हा एकदा गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे. शिवाय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या सुशिक्षित बेरोजगार तरुणांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री माफी मागतील का?, असा सवालही जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
राज्यकर्त्यांकडे वेळ नसल्यामुळेच आता संबंधित कंपनी गुजरात राज्यामध्ये गुंतवणूक करणार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना राजकीय सभा घेण्यापासून वेळ मिळत नाही. महाविकास आघाडी सरकार असताना मोठ्या प्रयत्नाने वेदांत ग्रुप आणि फॉक्स्कोन कंपनीकडून महाराष्ट्रात वीस बिलियन डॉलरची गुंतवणूक होणार होती मात्र राज्यकर्त्यांकडे वेळ नसल्यामुळेच आता संबंधित कंपनी गुजरात राज्यामध्ये गुंतवणूक करणार असल्याचा आरोप राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर केला आहे.
वेदांत ग्रुप व फोक्सकॉन कंपनीच्या संयुक्त भागीदारीत सुमारे २० बिलियन डॉलर्स म्हणजेच एक लाख अठ्ठावन्न हजार कोटी इतकी भांडवली गुंतवणूक असलेला प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटून गुजरातला गेलेला आहे. सुमारे एक लाख इतकी रोजगारक्षमता असलेला प्रकल्प महाराष्ट्राने गमावला असल्या तर ट्विट जयंत पाटील यांनी केला ( Jayant Patil criticized over migration issue ) आहे.
गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतला महाविकास आघाडीने या गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा केला ( Vedanta Group company project ) होता. या कंपनीच्या शिष्टमंडळाने नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना राजकीय सभा घेण्यातून वेळ मिळत नसल्याने पुन्हा एकदा गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. गुजरातच्या निवडणूक तोंडावर आल्याने महाराष्ट्रातील भाजपा गुजरातचे हित जपण्यात व्यस्त असल्याचा आरोप ही जयंत पाटील यांनी यावेळी केला. या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्रातील तरुणांचा हक्काचा रोजगार गमावल्याबद्दल राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री माफी मागतील का? असा सवालही जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे.