कोल्हापूर - कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीने राजकीय वातावरण आता चांगलेच तापु लागले आहे. दोन्ही प्रमुख पक्षांकडून आता प्रचाराला सुरुवात केली असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कडून चाय पे चर्चा म्हणत रोज सकाळी जनतेशी आणि कार्यकर्त्यांशी सवांद साधत आहे तर इकडे पालकमंत्री सतेज पाटील हे कोल्हापूरी मिसळवर ताव मारत मिसळ पे चर्चा चे आयोजन करत सभा घेत आहेत. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू असून आजही चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला डीवचत राष्ट्रवादीच सगळे सरकार चालवत असून काँग्रेस सेनेच्या नेत्यांचे फक्त गाड्या फिरवण्याचे काम सुरू असल्याची टीका त्यांनी केली आहे. तर त्याला प्रत्युत्तर देताना सतेज पाटील यांनी आम्ही एकसंघ असल्याचे म्हटले तर या निवडणुकीत भाजपला स्थानिक कार्यकर्त्यांवर विश्वास नसल्याने ते 40 नेते आणि तीन लाख लोक प्रचाराला आणायची भाषा करत असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांच्यावर केला आहे. तसेच चहावर कोल्हापूरची झणझणीत मिसळ भारी पडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ( Satej Patil on Chandrakant Patil ) आहे.
सतेज पाटलांची चंद्रकांत पाटलावर टीका - कोल्हापुरात मूळ भाजप नाराज आहे का याचं आत्मपरीक्षण करावे - भाजपच्या उमेदवारास कोल्हापूरकर साथ देतील असे चंद्रकांत पाटील म्हणत आहेत. मात्र असे असेल तर भाजपने 40 नेत्यांना आणि 3 लाख कार्यकर्ते महाराष्ट्रातून आणण्याचे नियोजन ते का करत आहेत असा प्रश्न त्यांनी विचारला आहे तसेच त्यांनी बाकीच्या पक्षांवर बोलण्यापेक्षा कोल्हापुरातील मूळचा भाजपचा कार्यकर्ता नाराज आहे का महेश जाधव वर किती अन्याय झाला आहे याचा त्यांनी आत्मपरीक्षण करावं असे सतेज पाटील यांनी म्हटले आहे. तसेच भाजप तिन्ही पक्षांमध्ये भांडण लावयच काम करत आहे. मात्र सर्व पक्ष एकत्र बसून निर्णय घेत असतात. म्हणून भाजप ने मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला तरी आमची आघाडी मोडणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.