मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुमत चाचणीत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर विधानसभेत आमदारांना त्यांचे अभिनंदन केलं. विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातील अभिनंदनपर भाषण केलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही जोरदार भाषण केलं. अभिनंदन भाषण करताना मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना टोमणे मारले आहे. फडणवीस तुमचं भाषण ऐकत होतो. फार स्तुती तुम्ही शिंदे यांची करत आहात. शिंदे सर्वगुणसंपन्न होते, तर 2014 साली रस्ते विकास खातेच का? दिले, असा टोला अजित पवारांनी एकनाथ शिंदे यांना लगावला ( Ajit Pawar Speech In Maharashtra Assembly ) आहे. अजित पवार यांच्या भाषणातील 8 प्रमुख मुद्दे कोणते पाहुयात -
"सत्ता येते जाते" - फडणवीस तुम्ही आपल्या भाषणात सारखं-सारखं एकनाथ शिंदे हे शिवसैनिक आहेत, असा उल्लेख करत आहात. फडणवीस यांना सारखं - सारखं एकनाथ शिंदे हे शिवसैनिक आहेत असे का?, सांगावं लागतं आहे. आज आमची भूमिका विरोधी पक्षाची आहे. लोकशाहीत हे चालत असतं. सत्ता येते असते जात असते. परंतु, फडणवीस तुमचं भाषण ऐकत होतो. फार स्तुती तुम्ही शिंदे यांची करत आहात. शिंदे सर्वगुणसंपन्न होते तर रस्ते विकास हेच खाते का? दिले होते. मुख्यमंत्री म्हणून तुम्ही जनतेसाठी उपयोगी असणारे खाते एकनाथ शिंदे यांना का दिले नाही, असा सवाल अजित पवारांनी विचारला.
"राज्यपाल अॅक्शन मोडवर" - सध्या राज्यपाल अॅक्शन मोडवर आले आहेत, असा खोचक टोला लगावताना अजित पवार यांनी म्हटलं, नाना पटोले यांनी राजीनामान दिल्यावर सव्वा वर्ष परवानगी द्यावी म्हणून आघाडीच्या वतीने राज्यपालांकडे मागणी करत होते. मात्र, आता निवड ताबडतोब झाली. इतकी फास्ट घटना पाहायला मिळाली की त्यामुळे राज्यातील लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे.
"काय झाडी... आलं" - मिरच्या झोंबल्या पाहिजेत असे काहीतरी टाक असे संदीपान भुमरे बोलत असल्याची एक क्लीप बाहेर आली. भुमरे काय मिरच्या झोंबल्या पाहिजेत, अशी विचारणा करतानाच मग शहाजीबापूची काय झाडी... आलं... काय हे बापू... अशी टिपण्णी करताना ही मोठी डोकी कधी एकत्र येतील कळणार ही नाही. तुम्ही साधे आमदार आहात हे लक्षात घ्या, असेही टोलाही अजित पवारांनी बंडखोर आमदारांना लगावला आहे.
"सर्वात भाग्यवान देवेंद्र फडणवीस" - गेल्या अडीच वर्षात देवेंद्र फडणवीस आधी मुख्यमंत्री झाले. त्यानंतर विरोधी पक्ष नेते झाले आणि आता उपमुख्यमंत्री झाले. फक्त अडीच वर्षात अशी महत्त्वाची तीन पदे भूषवणारा व्यक्ती म्हणजे देवेंद्र फडणवीस. म्हणून आपण त्यांना भाग्यवान समजतो, असा चिमटा फडणवीसांना अजित पवारांनी काढला आहे.
"बंडखोर आमदार टेबलवर चढून नाचत होते" - बंडखोर आमदार गेले आठ ते दहा दिवस आधी सुरत नंतर गुवाहाटी आणि मग गोवा असा प्रवास करत आहेत. याआधी कधीही एवढ्या कमी वेळात आमदार एवढे फिरले नसतील, तेवढे या आठ ते दहा दिवसात फिरले. आपली सत्ता येण्याचा आनंद सर्वांना होतो. मात्र, आनंद व्यक्त करताना बंडखोर आमदार टेबलवर चढून नाचत होते. हे आमदारांच्या प्रतिमेसाठी योग्य नाही. चार ते पाच लाख लोकांमधून आमदार निवडून येत असतो. त्यामुळे अशा प्रकारचं वागणं लोकांसमोर योग्य नसल्याचे, अजित पवारांनी काढले.
"राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा प्रयत्न" - राज्याचे अर्थमंत्री असताना आपण सर्वच लोकांना समान न्याय देण्याचा नेहमीच प्रयत्न केला. बंडखोर आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर अनेक आरोप केले. निधी दिला जात नाही, असा आरोपही सातत्याने करण्यात आला. मात्र, कोणत्या आमदाराला किती निधी दिला गेला याचे वाचनच अजित पवार यांनी सभागृहात केले. समोर बसलेल्या उदय सामंत, गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात दिलेला कामासाठी निधी तोही त्यांनी वाचून दाखवला. केवळ सत्ता पालट करण्यासाठी हे आमदार प्रयत्न करत होते. पण, काहीतरी कारण देण्यासाठी राष्ट्रवादीला बदनाम करण्यात येत असल्याची खंत अजित पवारांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली.
"नेते गेले तरी शिवसैनिक कधीही जात नाहीत" - बंडखोर आमदारांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडले. मात्र, आतापर्यंतच्या इतिहासात शिवसेनेत अनेक बंड झाली. पण, ज्या नेत्यांनी बंड केली त्यांच्यासोबत कधीही शिवसैनिक गेले नाहीत. एवढेच काय तर, ते नेते कधी पुन्हा निवडूनही आले नाहीत. तसेच, शिवसेनेच्या मदतीने भाजप महाराष्ट्रात वाढला. मात्र, सोबत असलेल्या शिवसेनेपेक्षा आता भाजपचे आमदार वाढलेले पाहायला मिळतात. 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 122 आमदार त्यांचे निवडून आले, तर 2019 च्या निवडणुकीत 106 आमदार निवडून आले. याचाही शिवसैनिकांनी विचार करावा, असे आवाहन अजित पवार यांनी आपल्या भाषणातून केले आहे.
"एकनाथ शिंदे व आम्ही..." - ११ जुलैला बंडखोर आमदारांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणार आहे. तरीसुद्धा अध्यक्षपदाची निवडणूक घेतली गेली. अपात्रतेचे प्रकरण असताना ठराव का? घेण्यात आला. विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी एकनाथ शिंदे व आम्ही राज्यपालांना भेटायचो त्यानंतर सगळे गेल्यावर राज्यपाल काय गप्पा मारायचे हे शिंदे तुम्हाला माहीत आहे, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.
हेही वाचा - Aaditya Thackeray : व्हिपचे उलंघन करणाऱ्यावर नक्कीच कारवाई, पुन्हा विधानसभेवर भगवा फडकेल - आदित्य ठाकरे