मुंबई - अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे राज्यात शंभरहून अधिक नागरिकांचा झालेला मृत्यू, पशुधनाची झालेली हानी, शेतजमीन व पिकांचे नुकसान, घरांची व दुकानांची पडझड, या सगळ्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Opposition Leader Ajit Pawar ) यांनी उद्या (२२ जुलै ) त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी आपला वाढदिवस साजरा करु नये, वाढदिवसानिमित्त होणारा खर्च टाळून तो निधीतून राज्यातील पूरग्रस्त शेतकरी, विद्यार्थ्यांना मदत करावी, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.
नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा - विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, हितचिंतकांनी कोणत्याही सोहळा-समारंभांचे आयोजन करु नये, पुष्पगुच्छ पाठवू नयेत, होर्डिंग्ज लावू नयेत, वृत्तपत्रे, टिव्ही, समाजमाध्यमांवर जाहिराती प्रसारित करु नयेत, यावर होणारा खर्च वाचवून त्या निधीतून पूरग्रस्त शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना मदत करावी. लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करुन नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे.
हेही वाचा - Draupadi Murmu : नगरसेविका ते देशाच्या प्रथम नागरिक; वाचा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा राजकीय प्रवास
वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय - अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे राज्यात शंभरहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पशुधनाची झालेली हानी, शेतजमिन व पिकांचं नुकसान, घरांची व दुकानांची पडझड, या सगळ्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी 22 जुलै रोजी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.