मुंबई - समीर वानखेडे यांच्या चौकशीसाठी एनसीबीचे एक पथक मुंबईत दाखल झाले आहे. यादरम्यान ते समीर वानखेडेंवर वसुलीचे आरोप लावणारे वादग्रस्त पंच प्रभाकर साईल आणि शाहरुख खानची मॅनेजर पुजा ददलानी यांचीदेखील चौकशी करणार आहे. त्यासाठी एनसीबीने मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहत मदत मागीतली आहे. प्रभाकर साईलला विजिलेंस टीम समोर आणण्यासाठी मदत करावी, अशी मागणी एनसीबीने मुंबई पोलिसांकडे केली आहे.
काय आहे प्रकरण -
मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरण मिटवण्यासाठी 25 कोटींची मागणी केल्याचा दावा करणाऱ्या प्रभाकर साईलने केला होता. त्यानंतर त्याने मुंबई पोलिसांच्या झोन एकच्या डीसीपी कार्यालयात जबाब नोंदविण्यात आला होता. ड्रग्ज प्रकरणी खटला निकाली काढण्यासाठी 25 कोटींचा सौदा झाल्याची चर्चा ऐकल्याचा दावा प्रभाकरने केला होता. त्यापैकी 18 कोटींचा करार होणार होता. तर 8 कोटी रुपये समीर वानखेडे यांना देण्यात येणार होते. प्रभाकरने आपल्या प्रतिज्ञापत्रात सॅम डिसूझा नावाच्या व्यक्तीचाही उल्लेख केला होता. प्रभाकरच्या म्हणण्यानुसार, त्याने एनसीबी कार्यालयाबाहेर सॅम डिसोझा यांची भेट घेतली. त्यावेळी ते के.पी.गोसावी यांना भेटण्यासाठी आले होते. लोअर परळजवळील बिग बझारजवळील एनसीबी कार्यालयातून दोघेही आपापल्या कारमध्ये पोहोचले. 18 कोटींमध्ये फिक्स करण्यासाठी गोसावी हे सॅम नावाच्या व्यक्तीशी 25 कोटी रुपयांवरून फोनवर बोलत असल्याचा दावा प्रभाकर साईल यांनी केला होता.