ETV Bharat / city

No Extension To Sameer Wankhede : समीर वानखेडेंना मुदतवाढ नाही, उद्या संपणार कार्यकाळ.. - Singer Mika Singh Foreign Currency Case

एनसीबीचे मुंबई झोनल डिरेक्टर समीर वानखेडे ( NCB Zonal Director Sameer Wankhede ) यांचा कार्यकाळ उद्या ( ३१ डिसेंबर) संपत आहे. मात्र त्यांना अद्यापही मुदतवाढ देण्यात आलेली नसल्याने ( No Extension To Sameer Wankhede ) वानखेडे यांच्या जागेवर नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

समीर वानखेडे
समीर वानखेडे
author img

By

Published : Dec 30, 2021, 5:08 PM IST

मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई झोनल डिरेक्टर अधिकारी समीर वानखेडे ( NCB Zonal Director Sameer Wankhede ) यांना अद्याप मुदतवाढ देण्यात आलेली नाही. समीर वानखेडे यांचा कार्यकाळ उद्या (३१ डिसेंबर) संपणार आहे. मात्र अद्यापही त्यांच्या कार्यकाळात कोणतीही मुदतवाढ दिली गेलेली ( No Extension To Sameer Wankhede ) नाही. त्यामुळे आता समीर वानखेडे यांची मुंबईतून बदली होणे जवळपास निश्चित झाले ( Sameer Wankhede Transfer From Mumbai ) असून, त्यांच्या ठिकाणी नवीन कोण अधिकारी येणार यासंदर्भात तर्कवितर्क लावण्यात येत आहे. त्याचबरोबर समीर वानखेडे यांची बदली दिल्लीत होणार ( Sameer Wankhede Delhi Transfer ) असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मुदतवाढीचे संकेत नाहीत

समीर वानखेडे यांच्या कार्यकाळ उद्या संपणार आहे. मात्र त्यांच्या मुदतवाढीचे कोणतेही संकेत आलेले ( Extension To Sameer Wankhede ) नाही. त्यामुळे समीर वानखेडेंना खुर्ची रिकामी करावी लागणा हे आता जवळपास निश्चित झाले आहे. समीर वानखेडेंच्या ऐवजी एनसीबीच्या विभागीय संचालकाच्या जागी आता नवीन कोण अधिकारी येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचप्रमाणे समीर वानखेडे हे ३१ डिसेंबरपासून रजेवर जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

अशी आहे वानखेडेंची कामगिरी

समीर वानखेडे यांच्या कारकिर्दीचा आढावा देखील ब्युरोने घेतला आहे. समीर वानखेडे यांनी ऑगस्ट ते डिसेंबर २०२० दरम्यान २८ केसेस रजिस्टर करून ९६ गुन्हेगारांना अटक केली आहे. २०२१ मध्ये १७ डिसेंबरपर्यंत समीर वानखेडे यांनी ११७ केसेस दाखल केल्या. त्यात २३४ गुन्हेगारांना अटक केली. त्यांनी तब्बल १ हजार कोटी रुपयांचे १७९१ किलो ड्रग्स जप्त केले. तर ११ कोटी रुपयांचा मालमत्ता गोठवली आहे.

वानखेडेंनी केल्या मोठ्या कारवाया

गेले काही महिने समीर वानखेडे यांच्या विरोधात वाद सुरु आहेत. त्यामुळे या पदावर मुदतवाढ न घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. सुशांतसिंग राजपूतच्या संशयास्पद ( Sushant Singh Rajput Death Case ) मृत्युनंतर ड्रग सिंडीकेट विरुद्ध सुरु झालेल्या कारवाईत वानखेडे सामील होते. या सिंडीकेटमध्ये अनेक बॉलीवूड कलाकार सामील असल्याचे पुरावे मिळाले ( Bollywood Drugs Connection ) आहेत. ऑक्टोबरमध्ये वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई किनाऱ्यावर एका क्रुझवर ( Cruise Drug Party Raid ) घातलेल्या धाडीत मादक पदार्थ मिळाले होते. त्यावेळी बॉलीवूड कलाकार शाहरुख यांचा मुलगा आर्यन खान याच्यासह ८ जणांना एनसीबीने ताब्यात घेतले ( Aryan Khan Drugs Case ) होते.

कोण आहेत समीर वानखेडे?

समीर वानखेडे २००८ च्या बॅचचे भारतीय महसूल सेवेतील IRS अधिकारी आहेत. भारतीय महसूल सेवेत येण्याआधी २००६ साली ते पहिल्यांदा केंद्र सरकारच्या सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशनमध्ये ( Central Police Organization ) रूजू झाले होते. CPO मध्ये केंद्रीय गुप्तचर विभाग, सीबीआय, नॅशनल क्राइम रिकॉर्ड ब्यूरो, नॅशनल डिजास्टर रिस्पॉन्स फोर्स, नॅशलन इनव्हेस्टिगेटिंग एजेंसी यांसारखे विविध विभाग येतात. त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाची UPSC परीक्षा पास झाल्यानंतर समीर वानखेडे भारतीय महसूल सेवेत रुजू झाले. भारतीय महसूल सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांची नियुक्ती कस्टम विभागात करण्यात आली. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ( Mumbai International Airport ) सहायक आयुक्त म्हणून समीर वानखेडे यांनी काही वर्षं काम केलं.

कोणकोणत्या पदांवर काम

२००८ ते २०२१ पर्यंत त्यांनी एअर इंटेलिजन्स युनिट (एआययू) ( Air Intelligence Unit ) चे उपायुक्त, राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) अतिरिक्त एसपी, महसूल गुप्तचर संचालनालयाचे (डीआरआय) संयुक्त आयुक्त आणि आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) विभागीय संचालक अशा विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

वर्ल्डकप ट्रॉफीही अडवली

२०१३ मध्ये वानखेडेंनी गायक मिका सिंगला परदेशी चलनासह मुंबई विमानतळावर पकडले ( Singer Mika Singh Foreign Currency Case ) होते. अनुराग कश्यप, विवेक ओबेरॉय आणि राम गोपाल वर्मा यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मालमत्तांवर त्यांनी छापे टाकले आहेत. २०११ मध्ये, सोन्याने बनवलेल्या क्रिकेट विश्वचषक ट्रॉफीला देखील कस्टम ड्यूटी भरल्यानंतरच मुंबई विमानतळावरून बाहेर पडण्याची परवानगी दिली होती.

कलाकार, ड्रग्ज विक्रेते घाबरले

एनसीबीच्या चौकशीत आयपीएस समीर वानखेडे यांच्या एन्ट्रीमुळे बॉलिवूडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे म्हटले जाते. बॉलिवूडमधील जे कलाकार ड्रग्ज घेतात किंवा मादक पदार्थांची खरेदी-विक्री करतात ते या क्षणी घाबरल्याची चर्चा आहे. डीआरआयमध्ये तैनात समीर वानखेडे यांना गेल्या वर्षी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये पाठवण्यात आले होते. आता समीर मुंबईत उपस्थित असलेल्या एनसीबी टीमचा एक भाग आहेत. सुशांत प्रकरणात ड्रग्ज अँगलचा तपास ते करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.