मुंबई- मुंबई एनसीबीकडून भिवंडी परिसरामध्ये मोठी कारवाई ( NCB Action In Mumbai ) करत 8640 नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कफ सिरपचा साठा जप्त केला ( Cough Syrup Seized In Mumbai ) आहे. या सर्व साठ्याची किंमत 35 लाख इतकी असल्याची माहिती समोर आली आहे. एनसीबीकडून सातत्याने अमली पदार्थ विरोधात कारवाया सुरूच आहे.
मुंबईतील भिवंडीच्या आग्रा-मुंबई महामार्गावर परिसरात शनिवारी (दि 21) रोजी एनसीबीकडून धडक कारवाई करण्यात आली आहे. मुंबई युनिटने भिवंड परिसरातून 8640 नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कफ सिरपचा साठा जप्त केला आहे. अचानक इतका मोठा साठा इथे कसा मिळाला असा सवालही यामुळे उपस्थित होत आहे. यासंदर्भातील अधिकचा तपास एनसीबीने सुरु केला आहे.
एनसीबीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मुंबईतील भिवंडी परिसरात एनसीबीच्या मुंबई युनिटने 8640 नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कफ सिरपचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी NCB मुंबई युनिटने दोघांना अटक केली आहे. भिवंडीच्या आग्रा मुंबई महामार्गावर हा साठा एका गाडीतून येणार असल्याची माहिती एनसीबीला आधी मिळाली होती. त्यानुसार एका संशयित बोलेरो पिकअपची NCB अधिकारऱ्यांनी झडती घेतली.
या संशयित वाहनातील 60 बॉक्समध्ये एकूण 864 किलो 8640 कोडीन आधारित कफ सिरप भरलेले आढळले आहे. जप्त केलेल्या या मालमत्तेची एकूण किंमत 35 लाख रुपये आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून एनसीबी अधिकरी या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध घेत आहे. पुढील तपास सुरु आहे.
हेही वाचा : मुंबईत एनसीबीची मोठी कारवाई दीड कोटींचे ड्रग्ज जप्त