ETV Bharat / city

Aryan Khan's Bail : आर्यन खानच्या जामीनाविरोधात NCB सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता - NCB सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता

आर्यन खानच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आर्यनच्या जामीनाच्या विरोधात एनसीबी (NCB) सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे. NCB कडून आर्यन खानच्या जामीनाविरोधात सुप्रीम कोर्टात अपील करण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे. हायकोर्टाची जामीन ऑर्डर आल्यानंतर एनसीबीच्या कायदेतज्ज्ञांमध्ये याबाबत चर्चा सुरू आहे.

Aryan Khan's Bail
NCB सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता
author img

By

Published : Nov 22, 2021, 12:45 PM IST

Updated : Nov 22, 2021, 3:17 PM IST

मुंबई - क्रूझ ड्रग्ज प्रकरणात ( Cruise Drugs Case ) शाहरुखचा मुलगा आर्यन खानला ( Aryan Khan ) मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. या विरोधात आता सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी NCB ने सुरु केली आहे. या प्रकरणातील हायकोर्टाच्या सविस्तर निर्णयाची वाट पाहत असून, जामीनाचे आदेश मिळाल्यानंतर सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी सुरु असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. २ ऑक्टोबरला क्रूझवरील छापेमारीवेळी आर्यन आणि त्याच्या साथीदारांना एनसीबीने ताब्यात घेतले होते. त्यानंतर २८ ऑक्टोबरला मुंबई हायकोर्टाने आर्यन आणि त्याच्या साथीदारांना जामीन मंजूर केला आहे.

उच्च न्यायालय म्हणाले होते -

मुंबई हायकोर्टाने आर्यन, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धनेला या तिघांना जामीन मंजूर केला. त्यानंतर शनिवारी मुंबई हायकोर्टाकडून या प्रकरणातील सविस्तर बेल ऑर्डर जारी करण्यात आली आहे. यात आर्यन खानविरोधात एनसीबीकडे कोणतेही ठोस पुरावे नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे. आर्यन आणि इतर कथित आरोपींनी एकत्र ड्रग्ज घेण्याबाबत कोणताही कट रचल्याचे पुरावे नसल्याचेही या सविस्तर ऑर्डरमध्ये नमूद करण्यात आले आहे. आर्यन खान याच्या व्हॉट्सअप चॅटलाही पुरावे म्हणून फारसे महत्त्व देण्यात आलेले नाही. फक्त एकत्र प्रवास केला आणि एकाचवेळी ते तिघेही क्रूझवर उपस्थित होते, याशिवाय कटाचा कोणताही आरोप या तिघांविरोधात सिद्ध करता आलेला नाही.

'व्हॉट्सअ‍ॅप चॅट्समध्ये काहीही आक्षेपार्ह नाही'

मुंबई उच्च न्यायालयाच्या १४ पानांच्या सविस्तर आदेशात प्रथमदर्शनी आर्यन खान आणि इतर आरोपींविरुद्ध असा कोणताही सकारात्मक पुरावा आढळून आलेला नाही की त्यांनी गुन्हा करण्याचा कट रचला होता असे म्हटले आहे. आर्यन खानच्या मोबाईलवरून घेतलेल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅट्समध्ये इतर आरोपींनी गुन्हा करण्याचा कट रचला होता असे दाखवण्यासाठी काहीही आक्षेपार्ह आढळले नाही असे न्यायालयाने म्हटले.

न्यायालयाने जामीन आदेशात केले नमूद -

एनडीपीएस कायद्याच्या कलम ६७ अंतर्गत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) नोंदवलेले आर्यन खानचे कबुलीजबाब केवळ तपासाच्या उद्देशाने विचारात घेतले जाऊ शकते, असेही आदेशात म्हटले आहे. आरोपीने एनडीपीएस कायद्यांतर्गत कोणताही गुन्हा केला आहे असा निष्कर्ष काढण्यासाठी हे शस्त्र म्हणून वापरले जाऊ शकत नाही असे जामीन आदेशात नमूद करण्यात आले होते.

कोर्टाने आदेशात म्हटले की -

षडयंत्र रचल्याच्या मुद्द्याबाबत आर्यन आणि अन्य दोन आरोपींविरोधात केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) जे पुरावे सादर केले, त्यावरून या तिघांविरोधात षड्यंत्र रचल्याचा कुठलाही सकारात्मक पुरावा प्रथमद्दर्शनी दिसत नाही. आर्यनकडे कोणतेही अंमली पदार्थ सापडलेले नाही याबाबत दुमत नाही. शिवाय अरबाज आणि धमेचा यांच्याकडे अंमली पदार्थांचा बेकायदा साठा आढळला तरी त्याचे प्रमाण अत्यल्प होते. अशा वेळी तिन्ही आरोपींनी षड्यंत्र रचल्याचा सकृद्दर्शनी पुरेसा पुरावा आहे का? आणि एनसीबी त्यांच्यावर कट रचल्याचा आरोप ठेवू शकते का, हे तपासणे आवश्यक आहे. त्यासाठी बेकायदा कृत्य केल्याचा पुरावा आहे का हे पाहावे लागते असे कोर्टाने या आदेशात म्हटले आहे.

हेही वाचा - सहकार क्षेत्रातील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करु - गृहमंत्री

Last Updated : Nov 22, 2021, 3:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.