ETV Bharat / city

आर्यन खानच्या जामीननंतरही चौकशी राहणार सुरू- एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह - केपी गोसावी

एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह म्हणाले, की के. पी. गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साहिलने जे माध्यमातून आरोप केले होते, त्यासाठी एक चौकशी समिती तयार केली आहे. त्याच्या चौकशीसाठी आम्ही प्रयत्न केला आहे. त्याची चौकशी केल्याशिवाय ठोस पुरावे येत नाही.

एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह
एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह
author img

By

Published : Oct 29, 2021, 7:04 PM IST

Updated : Oct 29, 2021, 7:28 PM IST

मुंबई - आर्यन खानसह तिघांना मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी जामिन दिल्यानंतर एनसीबीकडून प्रथमच प्रतिक्रिया आली आहे. न्यायालयाने आर्यन खानला जामीन दिला असला तरी क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणात आमची चौकशी सुरू राहणार असल्याची प्रतिक्रिया एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी दिली आहे.

मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरणात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. याशिवाय या प्रकरणातील एक पंच प्रभाकर साईल याने एक व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल करुन वानखेडे यांच्यावर 25 कोटीच्या लाचखोरीचा गंभीर आरोप करण्यात आला. या प्रकरणी समीर वानखेडे यांची चौकशी करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली होती. यानंतर समीर वानखडे यांच्या चौकशीसाठी एनसीबीने पाच सदस्यीय समिती गठीत केली आहे. या समितीचे सदस्य बुधवारी मुंबईत दाखल झाले आहेत.

आर्यन खानच्या जामीननंतरही चौकशी राहणार सुरू

संबंधित बातमी वाचा-'एनसीबी'चा वादग्रस्त पंच किरण गोसावीचा फरार असताना जळगावात मुक्काम?

आम्ही लवकरच निष्कर्ष लावू-

एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले की, या ड्रग्स पार्टी प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांनी केले. त्याबाबत आरोपाची चौकशी सुरू आहे. प्रभाकर साहिलच्या चौकशीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यांनी चौकशी साठी सहभागी व्हावे याकरीता मीडियाच्या माध्यमातून के. पी. गोसावी आणि प्रभाकर साईल यांना तपासात सहभागी होण्याचे आवाहनही केले आहे. कारण त्यांची चौकशी केल्याशिवाय कोणत्याही ठोस निर्णयापर्यत पोहचता येणार नाही. या प्रकरणातील मुख्य पंच के. पी. गोसावी सध्या कस्टडीमध्ये आहे. आम्ही न्यायालयाला विनंती करणार आहोत की, आम्हाला चौकशीसाठी के. पी. गोसावीला ताब्यात द्या. आम्हाला अपेक्षा आहे की, न्यायालय आमचे ऐकणार आहे. लवकरच आम्ही निष्कर्षापर्यंत पोहचू अशी आशासुद्धा एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित बातमी वाचा-राज्य सरकार स्थापन करत असलेल्या SIT विरोधात समीर वानखेडेंची मुंबई उच्च न्यायालयात याचिका

१४ अटींवर जामीन मंजूर

अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाला १ लाख रुपयांच्या व्यक्तीगत जातमुचलक्यासह १४ अटींवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आज (२९ ऑक्टोबर) याबाबत सविस्तर निकालपत्र दिले. गुरुवारी (२८ ऑक्टोबर) न्यायालयाने जामीन देण्याचा निर्णय दिला होता. त्यामुळे आर्यन खानसह तिघेही उद्या (30 ऑक्टोबर) तुरूंगाच्या बाहेर येण्याची शक्यता आहे.

एनसीबीने २ ऑक्टोबरला मुंबईत कॉर्टेलिया क्रूझवर छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत, एनसीबीने ८ लोकांना अटक केली आहे.

संबंधित बातमी वाचा-Aryan Khan Case LIVE : आर्यनची आजची रात्रही तुरुंगातच, उद्या होणार सुटका; कारागृह अधीक्षकांची माहिती

Last Updated : Oct 29, 2021, 7:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.