मुंबई- शहरात अमली पदार्थ विरोधी पथकाकडून ड्रग्ज तस्करांविरोधात मोठी मोहिम सुरु आहे. NCB ने मुंबईला ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या एका मोठ्या तस्कराला अटक केली. शादाब बटाटा असे या आरोपीचे नाव आहे. एनसीबीने मुंबईत तीन ठिकाणी छापेमारीची कारवाई केली. अंधेरी, वर्सोवा, लोखंडवाला आणि मिरारोड येथे छापेमारीची ही कारवाई करण्यात आली. NCB ने कारवाईत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केले असून बाजारात त्याची किंमत दोन कोटी इतकी असल्याची माहिती सूत्रानी दिली आहे
मुंबई मधील सगळ्यात मोठा ड्रग्स सप्लायर असलेल्या फारूक बटाटाचा मुलगा शहादाब बटाटाला अटक केली आहे. मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कडे गेल्या अनेक दिवसांपासून शाहदाब बटाटा मोठ्या प्रमाणात ड्रग्सच्या व्यवसायात सक्रिय आहे याची माहिती मिळाली होती. शाबाद हा तीन वेगवेगळ्या ठिकाणी ड्रग्सचा सप्लाय मोठ्या प्रमाणात होता. त्याचप्रमाणे एनसीबी ने सापळा रचला आणि वर्सोवा,लोकंडवाला,मीरा रोड या तिन्ही ठिकाणी धाड करत 2 कोटीं पेक्षा अधिकचे एमडी ड्रग्स जप्त केले. यासोबतच काही महागड्या गाड्या, रोख रक्कम आणि पैसे मोजण्याची मशीन ही एनसीबी ने जप्त केली आहे.
शादाब बटाटा हा मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्स सप्लायर फारुख बटाटाचा मुलगा आहे. शादाब चे कॉन्टॅक्ट मोठ्या लोकांसोबत होते, काही बड्या सेलिब्रेटिंग सोबत सुद्धा शादाबच उठणे बसणे होते. शादाब फक्त मुंबईतच नाही तर परदेशात सुद्धा ड्रग्स कारोबार मोठ्या प्रमाणात करायचा. शादाबला महागड्या गाड्या, कपडे आणि घड्याळयांची हाऊस होती. बड्या पार्टीजमध्ये लागणाऱ्या ड्रग्स सुद्धा शहादा सप्लाय करत होता. परदेशातून येणारे एलएसडी, कोकेन, एमडी, बड अश्या ड्रग्सचा भारतात सप्लाय फारुख बटाटा करत होता.