ETV Bharat / city

विदेशी ड्रग्ज तस्करांवर छापा टाकताना NCB चे 4 अधिकारी जखमी, एकाची प्रकृती गंभीर - विदेशी ड्रग्स तस्करांना अटक

चार ते पाच परदेशी नागरिक ड्रग्सचा व्यवसाय करत होते. रोज संध्याकाळी 7 ते 10 या वेळेत त्यांचा धंदा चालायचा. त्यानुसार वानखडे यांनी आपल्या पथकासह काल (गुरूवारी) संध्याकाळी धाड टाकली. यावेळी हत्यारबंद ड्रग्स तस्करांनी हल्ला केला. या हल्ल्यात एनसीबीचे अधिकारी श्रीकांत राऊत हे गंबीर जखमी झाले आहे.

ड्रग्स तस्कर
ड्रग्स तस्कर
author img

By

Published : Aug 13, 2021, 4:59 PM IST

Updated : Aug 13, 2021, 5:12 PM IST

मुंबई - ड्रग्स तस्करांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या एनसीबीच्या पथकावर हल्ल्याची घटना घडली आहे. परदेशी नागरिक असलेल्या ड्रग्स विकणाऱ्यांनी एनसीबीच्या अधिकाऱ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात एनसीबीचे 4 अधिकारी जखमी झाले आहेत. त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी दिली आहे.

माहिती देतांना एनसीबी अधिकारी
एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना मानखुर्द परिसरात मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. हर्बर लाइनवरील मानखुर्द आणि वाशी स्टेशनच्या दरम्यान असलेल्या रेल्वे रुळाच्या बाजूला खाडीचा मोठा भाग आहे. या भागात चार ते पाच परदेशी नागरिक ड्रग्सचा व्यवसाय करत होते. रोज संध्याकाळी 7 ते 10 या वेळेत त्यांचा धंदा चालायचा. त्यानुसार वानखडे यांनी आपल्या पथकासह काल (गुरूवारी) संध्याकाळी धाड टाकली. यावेळी हत्यारबंद ड्रग्स तस्करांनी हल्ला केला. या हल्ल्यात एनसीबीचे अधिकारी श्रीकांत राऊत हे गंबीर जखमी झाले आहे. त्याचप्रमाणे अमोल मोरे, प्रमोद मोरे, किरण रेवलकर,समीर साळेकर हे कर्मचारी जमखी झाले आहेत. श्रीकांत यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली आहे. यानंतरही एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी एका ड्रग्स पेडलर का अटक केली आहे. या कारवाईत अधिकाऱ्यांनी सुमारे एक कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त केले आहे. यात कोकेन, एमडी अशा प्रकारात हे ड्रग्स आहे. शिवाय एका नायजेरियन ड्रग्स तस्कराला देखील अटक करण्यात आली आहे. तर फरार चार आरोपींचा शोध सुरू आहे.

Last Updated : Aug 13, 2021, 5:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.