ETV Bharat / city

Nawab Malik Case : नवाब मलिक यांच्यावर 'NIA'च्या चौकशीची टांगती तलवार - नवाब मलिक यांची चौकशी

अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांना किडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केल्यानंतर त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (National Investigation Agency) ईडीने नवाब मलिक यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम अप्रत्यक्ष त्याच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयए एन्ट्री होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नवाब मलिक
नवाब मलिक
author img

By

Published : Feb 27, 2022, 1:50 PM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांना किडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केल्यानंतर त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ईडीने नवाब मलिक यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम अप्रत्यक्ष त्याच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. (Nawab Malik On NIA ) त्यामुळे आता या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयए एन्ट्री होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नवाब मलिक यांच्या डोक्यावर (NIA)ची चौकशीची टांगती तलवार असल्याने नवाब मलिक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

इब्राहिम चा भाव इक्बाल कासकर याची देखील चौकशी

कुर्ला येथील जमीन खरेदी प्रकरणात नवाब मलिक यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मनी लॉन्ड्रिंग झाले असल्याचे ईडीला संशय आहे. त्या आधारावर ईडीने तपास सुरू केला असता त्यामध्ये दाऊद इब्राहिम ची बहीण हसीना पारकर चा मुलगा त्याची देखील चौकशी करण्यात आली तसेच दाऊद इब्राहिम चा भाव इक्बाल कासकर याची देखील चौकशी करत सात दिवसाची कस्टडी ईडीने घेतली होती. कुर्ला येथील जमिनी हसीना पारकर कडून घेतल्याने जमिनी घोटाळ्याला अंडरवर्ल्डशी संबंध आल्याने या प्रकरणात आता राष्ट्रीय तपास यंत्रणा नवाब मलिक यांची चौकशी करण्याची शक्यता आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा तपास राष्ट्रीय तपास

राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि ईडी हे संयुक्तरीत्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम ह्याच्यासंबंधित झालेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात संयुक्त तपास करत आहे. केंद्रीय मंत्रालयाने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेला दिल्यानंतर दाऊद इब्राहिम विरोधात UAPA कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून एनआयए ने मुंबई ईडीच्या साह्याने अनेक ठिकाणी छापेमारी केली होती. (Nawab Malik likely to be Inquiry By NIA) त्याच छापेमारी दरम्यान दाऊद इब्राहिम ची बहीण हसीना पारकर तिच्यासह छोटा शकील चे नातेवाईक सलीम फ्रुट तसेच दाऊद इब्राहिम चा भाऊ इक्‍बाल कासकर याची देखील चौकशी ईडी ने केली आहे तपासादरम्यान नवाब मलिक यांचे नाव समोर आल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणा हेदेखील नवाब मलिक यांची चौकशी करण्याची शक्यता

दाऊद इब्राहिम ची बहीण हसीना पारकर तिच्याकडून नवाब मलिक यांनी कुर्ला येथील घेतलेली जमीन प्रकरणात मलिक यांना अटक केल्यानंतर आता या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा हेदेखील नवाब मलिक यांची चौकशी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तसेच नवाब मलिक यांच्यावर सुद्धा या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळाली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नवाब मलिक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मनी लॉन्ड्रिंगच्या हवालामार्फत पैसा पुरोला जात असल्याची माहिती

राष्ट्रीय तपास यंत्रणा ही देशातील आतंकवादी संघटनाच्या विरोधात तपास करणारी संघटना आहे देशांमध्ये होत असलेल्या दहशतवादी कामगिरी विरोधात तपास करणे या संघटनेचे महत्त्वाचे काम असून या संघटनेला जागतिक गुन्हेगारी जगातील सर्वात मोस्ट वांटेड डॉन दाऊद इब्राहिम ची देखील केस केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा सक्रीय झाले आहे त्याच अनुषंगाने NIA मिळालेल्या माहितीनुसार दाऊद इब्राहिमला मुंबईतून मोठ्या प्रमाणात मनी लॉन्ड्रिंगच्या हवालामार्फत पैसा पुरोला जात असल्याची माहिती मिळाली आहे.

अंडरवर्ल्डचे पंजाब कनेक्शनबाबत माहिती

90 च्या दशकात फरार झालेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसंबंधित लोकं मनी लाँड्रिंगमध्ये सामील असल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय तपास एजेंसीला अंडरवर्ल्डचे पंजाब कनेक्शनबाबत माहिती मिळाली होती. पंजाबमध्ये अस्थिरता फैलावण्यासाठी पाकिस्तानी गुप्तचर एजेंसी आयएसआय अंडरवर्ल्डचा आधार घेत असल्याचे समोर आले होते. दरम्यान माहितीनुसार अंडरवर्ल्डसंबंधित लोकं मोठ्या प्रमाणात मुंबईहून पंजाबला पैसे पोहोचवलत आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आले होते आरोप

1993 च्या बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात गुन्हेगार असणारे सरदार शहावली खान आणि सलीम पटेल या दोघांकडून नवाब मलिक यांनी कुर्ल्यातील जमीन खरेदी केली होती. कुर्ल्यात मोक्याच्या परिसरामध्ये ही तीन एकर जागा असल्याचे फडणीसांनी सांगितले होते. 2005 मध्ये या ठिकाणी दोन हजार रुपये स्क्वेअर फुटच्यावर भाव असताना केवळ पंचवीस रुपये स्केअर फुट किमतीवर ही जमीन खरेदी कशी केली ? असा प्रश्न पत्रकार परिषदेतून देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला होता. मात्र या जमीन खरेदीत कोणताही गैरव्यवहार झाला नसून देवेंद्र फडणवीस सांगत असलेल्या तीन एकर जागा आपण खरेदी केली नाही. त्या जागेवरील काही भाग कायदेशीर रित्या खरेदी केला असल्याचे स्पष्टीकरण नवाब मलिक यांच्याकडून पत्रकार परिषदेत देण्यात आले होते.

पोटात दुखत असल्याने नवाब मलिक यांच्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरू

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची ईडीने अटक केल्यानंतर तिसऱ्या दिवशी नवाब मलिक यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांना जे जे रुग्णालयात तपासणीकरिता नेण्यात आले होते त्यावेळी त्यांना डॉक्टरांनी ॲडमिट करण्याची सूचना ईडी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांना ऍडमिट केले. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार ईडी अधिकारी आता खाजगी डॉक्टरांना नवाब मलिक यांची तपासणी करण्याकरिता आणणार असल्याचे देखील माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

हेही वाचा - IT Raid On Yashwant Jadhav : तिसऱ्या दिवशीही आयकर विभागाची छापेमारी सुरूच

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.