ETV Bharat / city

...हा तर ठरवून झालेला कार्यक्रम; नवाब मलिकांची पंतप्रधान मोदींवर टीका

पंतप्रधान नेहमी परचा आणि मास्क वापरतात. मात्र, त्याचदिवशी परचा आणि मास्क दोन्ही गायब होते. याचा अर्थ भावून होण्याचा कार्यक्रम हा ठरवून झालेला कार्यक्रम होता, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

nawab malik critisize narendra modi for getting emotional
...हा तर ठरवून झालेला कार्यक्रम; नवाब मलिकांची पंतप्रधान मोदींवर टीका
author img

By

Published : May 23, 2021, 8:03 PM IST

मुंबई - मुख्यमंत्र्यांसोबत स्वतःच्या केबिनमध्ये बसून व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे बोलताना पंतप्रधान नेहमी परचा आणि मास्क वापरतात. मात्र, त्याचदिवशी परचा आणि मास्क दोन्ही गायब होते. याचा अर्थ भावून होण्याचा कार्यक्रम हा ठरवून झालेला कार्यक्रम होता, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. याच कार्यक्रमात मोदींनी मास्क का घातला नाही. तसेच परचा का घालून आले नाहीत. ते खरंच भावूक झाले की ठरवून झाले, यावर जनता प्रश्न करत आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.

प्रतिक्रिया
केंद्रसरकारच्या हलगर्जीपणामुळे अनेकांनी जीव गमावला -

देशात लाखोंच्या संख्येने लोकांनी आपला जीव गमावला आहे. अनेकांना औषधोपचार मिळणे कठीण झाले आहे. तसेच प्रशासनही पूर्णपणे ठप्प झाले आहे. केंद्रसरकारच्या हलगर्जीपणामुळे अनेकांनी जीव गमावला आहे. मोदी सरकारच्या विरोधात जनआक्रोश निर्माण झाला आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले होते. असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

काय आहे प्रकरण -

दरम्यान, 21 मे रोजी वाराणसी येथीस डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफ शिवाय इतर फ्रंटलाईन वर्कर्स यांच्याशी संवाद साधला होता. यावेळी कोरोनाच्या परिस्थितीबाबत डॉक्टरांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाले होते. कोरोनाच्या काळात आपण अनेकांना गमावलं आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा - पाळणा घरातील सात वर्षीय मुलीवर अत्याचार; नराधमाला पोलीस कोठडी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.